आधी रवी राणा बोलत होता म्हणून नवनीत राणा पडल्या, आता नवनीत राणा बोलत आहेत रवी राणा पडणार : बच्चू कडू
Bachchu Kadu on Navneet Rana and Ravi Rana, अमरावती : "अजुल फजुलवर आम्ही बोलत नाही. आधी रवी राणा (Ravi Rana) बोलत होता म्हणून नवनीत राणा (Navneet Rana) पडल्या , आता नवनीत राणा बोलत आहेत तर तो रवी राणा पडणार आहे."
Bachchu Kadu on Navneet Rana and Ravi Rana, अमरावती : "अजुल फजुलवर आम्ही बोलत नाही. आधी रवी राणा (Ravi Rana) बोलत होता म्हणून नवनीत राणा (Navneet Rana) पडल्या , आता नवनीत राणा बोलत आहेत तर तो रवी राणा पडणार आहे. काल जे कोणी आलतू फालतू बोललं ते किस किस गली की खिच खिच है. आग लग गई तो धुव्वा निकलेगा", असं म्हणत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर पलटवार केला. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
चांदुर बाजारमध्ये 5 लाख अन् 2 लाख दिले, खासदार होत्या का नगरसेवक?
बच्च कडू म्हणाले, याच्या बडनेरा मतदारसंघात गिरणी बंद पडली, हा इथं टमरट घेऊन बोंबलत आहे. आम्ही 10 आमदार निवडून आणणार आहे. चांदुरबाजारमधून आम्ही सरकार चालवू. मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीवर उभे होते तेव्हा एकदाही जय श्रीराम आठवलं नाही. निवडणुकीसाठी श्रीरामाला वापरतात. पाच वर्षे खासदार होते, एक काम केलं नाही. चांदुर बाजारमध्ये 5 लाख अन् 2 लाख दिले. खासदार होत्या का नगरसेवक? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
तू आमची काय बरोबरी करत आहात, 115 वेळा बच्चू कडूने रक्तदान केलं
तुमच्या दोघांनी तर अख्खा जिल्हा खराब केला, समोरासमोर स्टेजवर येऊन चर्चा कर म्हणा. बोलायला तर एवढं आहे की, आंघोळ करायला पाण्याची गरज पडणार नाही, घामाने अंघोळ होईल. तू आमची काय बरोबरी करत आहात 115 वेळा बच्चू कडूने रक्तदान केलं. आम्ही कोणाचा पाठिंबा घेत नाही दिला तरी घेत नाही. आमची बरोबरी करण्याची तुमची अवकात नाही. एखादं बावळट पोट्ट आहे म्हणून सोडून द्या त्याला, असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं.
नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या?
चार दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी परतवाडा येथे आयोजीत दहीहंडीत आपल्या भाषणात बच्चू कडू यांच्यावर सडकून टिका केली होती. नवनीत राणांनी केलेल्या 'गारुडी, सुपारी बहाद्दर, ढोंगी" अशी बिरुद लावत बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बच्चू कडूंनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. चांदूरबाजार येथे आमदार बच्चू कडू यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी चला हवा येऊ द्या फेम प्रवीण तिखे, अभिनेत्री व गायक अक्षता सावंत, अँकर प्रनोती प्रमुख उपस्थिती होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या