![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhaji Patil Nilangekar : स्वत:च्या मतदारसंघात रस्ता करता येत नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात; संभाजी पाटील निलंगेकरांची अमित देशमुखांवर टीका
Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh, लातूर : ज्यांना स्वत:च्या मतदारसंघात रस्ता करता आला नाही, ते जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात.
![Sambhaji Patil Nilangekar : स्वत:च्या मतदारसंघात रस्ता करता येत नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात; संभाजी पाटील निलंगेकरांची अमित देशमुखांवर टीका Sambhaji Patil Nilangekar Can't make a road in own constituency plans to lead district Sambhaji Patil Nilangekar's criticism of Amit Deshmukh Marathi News Sambhaji Patil Nilangekar : स्वत:च्या मतदारसंघात रस्ता करता येत नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात; संभाजी पाटील निलंगेकरांची अमित देशमुखांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/31/cace105a31d7e5c5e2df5257c1a4dd7e1725118258906924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh, लातूर : ज्यांना स्वत:च्या मतदारसंघात रस्ता करता आला नाही, ते जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात. लातूरला पाणी पाहिजे होते त्यावेळी घरणी प्रकल्पातून पाणी चोरण्यासाठी देशमुख आले होते. एक थेंबही नेऊ देणार आहे. अमित देशमुख हे लातूरचे पालकमंत्री असताना त्यांनी निलंगा मतदारसंघासाठी एक रुपया दिला नाही. आमचे सोडा स्वताच्या मतदारसंघात तरी कोणते काम आणलेली आहेत ते तपासून पहा, अशी टीका भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर केली. ते लातूरमध्ये बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप नेते सुरेश धसही उपस्थित होते.
निलंगा मतदारसंघामध्ये तीनशे किलोमीटर अंतर पायी चालत दहा दिवस चालणाऱ्या जन सन्मान पदयात्रा काढण्यात आली आहे. भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही पदयात्रा आयोजित केली आहे. या जन सन्मान पदयात्रामध्ये आज शिरूर अनंतपाळ येथे जाहीर सभा आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग हजर होता.
राजकारणात गुत्तेदार नावची एक जात आहे, उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे हेच असतात
सुरेश धस म्हणाले, राजकारणात गुत्तेदार नावची एक जात आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे हेच असतात. सत्ता कोणाचीही येवो हे तिकडे जातात. ही मलिदा गँग असते. मात्र सर्व सामान्य लोकांचे काम करण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली आहे. यातील सर्व सामान्य आशा वर्कर यांनी कोविड काळात जीव हातात घेऊन काम केले आहे. मला असला मतदारसंघ दिला होता. ज्या ठिकाणी भाजपा नव्हती मात्र गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास सिद्ध केला. नेत्याचे मनगट सर्वसामान्य लोकांचे हातात बसले पाहिजे , असंही सुरेश धस यांनी नमूद केलं.
मित देशमुख यांच्याकडे होती, मात्र त्यांनी काहीच काम केले नाही
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, कोविड काळात सगळ्यात जास्त संधी मोठे होण्याची अमित देशमुख यांच्याकडे होती, मात्र त्यांनी काहीच काम केले नाही. विलासराव देशमुख यांचे वागणे बोलणे चालणे फार वेगळे होते. ते पुढच्या पिढीत नाही. जे लोकांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत त्याच्या मागे लोकांनी जाऊ नये. यातून तुम्हीच ओळखून घ्या ते काय आहेत, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मोठी बातमी : राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, 16 वर्षांपूर्वीचं प्रकरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)