संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, अमित शाहांची सांगलीत फटकेबाजी
Amit Shah on Sangli Loksabha : विधानसभेत आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे काम मोदीजींनी केले.
Amit Shah on Sangli Loksabha : "विधानसभेत आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे काम मोदीजींनी केले. संजयकाका एकदा निवडणूक लढा. पुढील वेळेस महिलेचा नंबर लागू शकतो. पुढच्या वेळी गॅरेंटी राहणार नाही. तिहेरी तलाक हटवण्याचे काम मोदींनी केले", असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले. अमित शाह यांनी सांगलीत संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. अमित शाहांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
सांगलीसाठी संजयकाका मोदींसोबतही लढले आहेत
अमित शाह म्हणाले, मी नकली शिवसेनेच्या अध्यक्षांना विचारतो की, सीएए लागू केला पाहिजे की नाही? पीएफआयवर बंदी लावली पाहिजे की नाही? दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या टप्प्यांमध्ये मोदी साहेब सेंच्युरी मारून पुढे गेले आहेत. तिसरा टप्पा चारशे पार जाण्यासाठी महत्वपूर्व असणार आहे. मी संजयकाकांना सांगलीसाठी माझ्यासोबतही लढताना पाहिले आहे. सांगलीसाठी ते मोदींसोबतही लढले आहेत. सध्या दोन गट आहेत. एक गट राम मंदिराला विरोध करणारा आहे. दुसरा गट मोदीजींचा आहे, एनडीएचा आहे. जो राम मंदिर बनवणारा आहे. तुम्ही कोणाच्या पाठिशी राहणार आहात सांगा, असा सवाल शाह यांनी सांगलीतील लोकांना विचारला.
राहुलबाबाची चायनिज गॅरंटी आहे
पुढे बोलताना शाह म्हणाले, एका बाजूला व्होट फॉर जिहाद म्हणणारे लोक आहेत. दुसऱ्या बाजूला आम्ही व्होट फॉर विकास म्हणणारे लोक आहोत. आपल्या मुला-मुलींचे कल्याण करणारे लोक आहेत. दुसरकडे आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात देशाचे कल्याण करणारे आहोत. राहुलबाबाची चायनिज गॅरंटी आहे. तर दुसरीकडे मोदींची भारतीय गॅरंटी आहे. संजयकाका विजयी होतीलच पण ते विजयी झाले तर मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. संजयकाकांना दिलेले मत देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवेल. मोदीजी जे बोलतात ते करुन दाखवतात.
मोदींनी 5 वर्षात राम मंदिर उभारले
काँग्रेसने राम मंदिराचा विषय 70 70 वर्ष दोन प्रलंबित ठेवला. केसला भटकवत ठेवले. मोदींनी मात्र 5 वर्षात राम मंदिर उभारले आणि मंदिर दर्शनासाठी खुले ही केले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा बहिष्कार उद्धव ठाकरे, शरद पवार आणि प्रियंका गांधी यांनी केला. कोरोनाच्या लसीला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी लस म्हणून हिनवले आणि रात्री बहिनीसोबत जाऊन स्वतः लस टोचली. मोदींनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, असा दावाही शाह यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
कल्याण लोकसभेत मोठा ट्वीस्ट, मातोश्रीवरुन रमेश जाधवांना अर्ज भरण्याचे आदेश, श्रीकांत शिंदेंविरोधात कोण लढणार?