एक्स्प्लोर

Nagpur Violence : नागपुरात शेकडो वाहनांची जाळपोळ, पोलिसांवर ही दगडफेक; शहरात तणावपूर्व शांतता; आतापर्यंत काय काय घडलं? 

Nagpur Violence : नागपूरमध्ये काल (सोमवार, 17 मार्च ) अचानक उसळलेले दंगल सदृश्य परिस्थितीनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? हे जाणून घेऊ .

नागपूर: नागपूरमध्ये काल (सोमवार, 17 मार्च ) अचानक उसळलेले दंगल सदृश्य परिस्थितीनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.  शहरातील महाल भागासह इतर परिसरात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. यात कित्येक निष्पाप नागरिकांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञातांनी आग लावून पेटवून दिलीत.

तर दुसरीकडे  शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात प्रमुख्याने महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. परिणामी या संवेदनशील भागाला आता छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच आता पोलीस आणि स्थानिक प्रशानाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून शहरात सध्या तणावपूर्व शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली.  घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले.

आतापर्यंत नागपुरात नेमकं काय काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर  नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं. त्यानंतर  संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली.

घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगवण्यात आलं. मात्र कालांतराने ही बाब परिसर वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात मॉब महाल परिसरात जमा झाला. त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. 

महाल परिसरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन

त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून मुख्य रस्त्यावरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, मात्र हा जमाव परिसरातील छोट्या गल्लीबोळात पोहचला. यावेळी या जमावाने नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहाने जाळून टाकण्यात आली. नंतर पोलिसांचा मोर्चा या परिसरात वळता झाला आणि येथे ही पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून जवळ जवळ 80 दंगलखोरांना अटक केली आहे. तर हे कृत्य बाहेरून येणाऱ्या लोकांनी केलं असून टिपून दगड फेक केली असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. 

सागर बंगल्यावर महत्वाची बैठक

दरम्यान, नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सागर बंगल्यावर महत्वाची बैठक बोलवण्यात आली. नागपूर प्रकरण शांत करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका असून कोणालाच सोडणार नाही. नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण? हे शोधून काढणाचे आदेश पोलिसांना देण्यात आले. तर रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश ही यावेळी देण्यात आले.

नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत तासभर चर्चा झाली. दरम्यान बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे सकाळी तत्काळ नागपूरच्या दिशेला रवाना होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे अन्य आमदार आज घटनास्थळाची  पाहणी करणार आहे. तर वित्तीय नुकसानासह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा देखील आढावा घेणार आहे. 

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव कायम असल्याचे दिसत आहे.
     

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget