एक्स्प्लोर

नेरूळच्या महिलेनं भाजी विकून पै अन् पै जोडली, पोटाला चिमटा काढून टोरेसमध्ये गुंतवली; भाबडी आशा ठेवली अन् फसवणूक झाली!

Torres Jewellers Scam : टोरेस कंपनीच्या माध्यमातून Moissanite डायमंड (लॅबमध्ये बनवण्यात आलेले) देऊन लाखो लोकांना कोटी-अब्जावधी रूपयांचा चुना लावला. गोरगरीब गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाचे पैसे दिले होते.

Torres Jewellers Scam : मुंबई (Mumbai News) आणि नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai News) एका कंपनीनं हजारो रुपयांच्या परताव्यांचं अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. टोरस नावाच्या या कंपनीनं आपल्या मुख्य आऊटलेटसह इतर सर्व शाखांना टाळं लावलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याचं समोर आलं आहे. हिऱ्यामध्ये गुंतवणूक करुन महिन्याला 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला हे सगळे गुंतवणूकदार बळी पडले आहेत. काहींनी घरं-दारं विकली, तर कहींनी राहात्या घरावर कर्ज काढलं, कुणी आयुष्याची जमापुंजी देऊन टाकली, तर कुणी पै अन् पै जमा करुन गुंतवणूक केली. 

टोरेस कंपनीच्या माध्यमातून Moissanite डायमंड (लॅबमध्ये बनवण्यात आलेले) देऊन लाखो लोकांना कोटी-अब्जावधी रूपयांचा चुना लावला. गोरगरीब गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाचे पैसे दिले होते. महिन्याला 44 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांना ना हप्ते मिळाले. ना दिलेला डायमंड असली निघाला. अनेकांचा विश्वास संपादन करुन टोरेस कंपनीनं गंडा घालून पळ काढला. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. काय करावं? कुणाला सांगावं? काही सुचत नव्हतं. 

भाबडी आशा ठेवली अन् मोठी फसवणूक झाली

नेरूळ इथे भाजीव्यावसाय करणाऱ्या आरती मोहिते यांनी टोरेस कंपणीमध्ये 10 हाजार गुंतवले होते. टोरेस कंपनी दिलेल्या पैशाला आठवड्याला 11 टक्के रिटर्न्स आणि सोबत डायमंड देत असल्यानं याचा घर खर्चाला चांगला फायदा होईल, या भाबड्या आशेपोटी आरती मोहिते यांनी 10 हजार रुपये गुंतवले. पोटाला चिमटा काढून, 10 टक्के व्याजाने पैसे घेत टोरेस कंपनीमध्ये दिले. यावेळी कंपनीनं त्यांना डायमंड देत पुढील दोन वर्षांत याची किंमत लाखोच्या घरात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आरती यांना दिलेला डायमंडचा तुकडा तर बनावट निघालाच, दुसरीकडे दिलेल्या पैशाचा एकही हाप्ता मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत 'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीनं 2024 मध्ये 'टोरेस' ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले. त्यानंतर कंपनीनं सोनं, चांदी आणि Moissanite (लॅबनं तयार केलेले हिरे) खरेदीवर त्याच रकमेवर अनुक्रमे 48, 96 आणि 520 टक्क्यांचा ​​वार्षिक परतावा देण्याचं वचन दिलं. त्यानंतर गुंतवणूकदारांना दर आठवड्याला परतावा दिला जात होता. दोन आठवडे परताना न मिळाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली आणि टोरेसचा 2025 मधला सर्वात मोठा स्कॅम उघडकीस आला. 

पाहा व्हिडीओ : Torres Company Fraud: 44 टक्क्यांचा परतावा देतो सांगत गंडवलं, सर्व कार्यालयं बंद करीत कंपनी पसार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीसJitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
सरकार बीडमध्ये तुकाराम मुंढेंची नियुक्ती करणार का? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Embed widget