Uddhav Thackeray Nashik Visit Live Updates : उद्धव ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nashik : अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या निमित्त उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते काळाराम मंदिरात महाआरती करणार आहे. या दौऱ्याचे क्षणाक्षणाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये
LIVE

Background
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदावरी आरती
काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रामकुंड येथे दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरीची आरती आणि जलपूजन करण्यात आले. यावेळी 'गंगा गोदावरी माता की जय'च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रामकुंडाकडे रवाना
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा आणि महा आरती करण्यात आली. यानंतर आता उद्धव ठाकरे हे रामकुंडाकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हस्ते रामकुंड येथे महाआरती करण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray : मुंबई नाक्यावर उद्धव ठाकरेंचे जोरदार स्वागत
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिक येथील मुंबई नाका परिसरात नुकतेच आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंचे स्वागत फुलांचे उधळण करून करण्यात आले.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काळाराम मंदिराकडे रवाना
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच काळाराम मंदिराकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे रामकुंड येथे जावून गोदाआरती करणार आहेत.
Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेटीप्रसंगी उद्धव ठाकरेंचे आवाहन
सावरकर स्मारकात सावरकरांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी छायाचित्रामागील इतिहास जाणून घेतला. तर उद्धव ठाकरे यांनी स्मारकाचे आधुनिकीकरण करताना छायाचित्रे गॅलरी आहे तशीच ठेवा, हे छायाचित्र छान दिसत आहेत, असे आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
