Nashik Police : शिंदे साहेब! इकडंही लक्ष द्या! गळके छत, पडक्या भिंती, सापांचा वावर, नाशिकमध्ये पोलिसांची वसाहत कि वाताहत
Nashik Police : पोलिसांना (police) राहण्यासाठी नीट घर सुद्धा नसल्याचा धक्कादायक वास्तव नाशिकच्या (Nashik) पोलीस वसाहतीमध्ये समोर आले आहे.

Nashik Police : उत्सव असो एखादी राजकीय सभा असो किंवा पूर आलेला असो खाकी वर्दी ही नेहमीच आपल्या संरक्षणासाठी सज्ज असते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून स्वतःचे घरदार विसरून पोलीस (Police) डोळ्यांमध्ये तेल घालून आपलं कर्तव्य बजावत असतात. मात्र त्याच पोलिसांना राहण्यासाठी नीट घर सुद्धा नसल्याचा धक्कादायक वास्तव नाशिकच्या पोलीस वसाहतीमध्ये समोर आले आहे.
एकीकडे गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीत राज्यातील पोलिसांनी डान्स केल्यानंतर चौफेरहून टीका करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणारे पोलिसांना मात्र घरापासूनच अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. नाशिककरांना (Nashik) सुरक्षितेची जबाबदारी पेलणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे वास्तव्यच धाेक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकराेड पाेलिस कर्मचारी वसाहतीत आढळून येत आहे. नाशिकराेड पाेलिस ठाण्याला लागून असलेल्या 150 कर्मचाऱ्यांची वसाहतीची वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकरोड परिसरात पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये हे भीषण वास्तव समोर आले आहे. या वसाहतीत 150 निवासस्थाने असून त्यातील 85 घरांची दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत 60 घरांमध्ये कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयअसून अनेक घरांच्या भितींचीही पडझड झाली आहे. तर पावसाला सुरु असल्याने अनेक घरांच्या भिंती ओलसर झाल्या असून अनेक घरांत पाणी गळती हाेत आहे. वसाहतीत अनेक पत्र्याची घर आहेत. यामुळे पोलीस कुटुंबांना म्हणजे दुपारच्या वेळी घरात फॅन लावण्याशिवाय शिवाय पर्याय नसतो. यासोबतच इथे जी इलेक्ट्रिकची फिटिंग असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा द्यायला हव्यात. त्या सुविधांची वानवा असून अनेक मेंटेनन्स ची कामे पुढे आली आहेत.
पाेलिस वसाहतीमध्ये घरांच्या भिंतीची पडझड झाली असून पत्रे गळतात, परिसरात गाजरगवत वाढले असून जागाेजागी पाणी साचून डबके तयार झाले आहे. गवत वाढल्याने सापांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. या परिसरात पाेलिस कर्मचाऱ्यांची लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने उपाययाेजना करण्याची गरज आहे. गटारी व्यवस्थित नियोजन नसल्याने तुंबण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. नाशिकसह अनेक ठिकाणी जवळपास हीच परिस्थिती बघायला मिळते. जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांना सर्व सुविधायुक्त चांगली घर आता मिळणार का? सरकार या सर्व परिस्थितीत कडे गांभीर्याने बघणार का? हे पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे.
पाेलिस कल्याण निधीच काय झाल?
एकीकडे पोलिसांसाठी पोलीस कल्याण योजना कार्यान्वित असताना आशा प्रकारे नाशिकच्या पोलीस वसाहतीत मात्र दुरावस्था बघायला मिळते आहे. मग पोलीसांच्या वसाहतीसाठी विकासासाठी असणाऱ्या निधीच काय झाल? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पडणाऱ्या पोलिसांच्या नशिबी अशी दुरावस्था का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पोलीस कल्याण निधी अंतर्गत घर असतील, इतर सोयीसुविधा असतील, परिसरात असलेल गार्डन यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
