एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला बळकटी देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली. या योजनेद्वारे ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. आता या योजनेला बळकटी देण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या कामकाजासाठी संगणक आणि प्रिंटर (स्कॅनरसह) खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संगणक  अन् प्रिंटर खरेदीसाठी 5 कोटींपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

शासन निर्णयात काय म्हटलं?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाच्या बळकटीकरणासाठी 5 कोटी रुपयांच्या मर्यादेत संगणक आणि प्रिंटर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. हा शासन निर्णय 5 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभाग मुंबई, आयुक्त महिला व बालविकास, पुणे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अशा एकूण 38 कार्यालयांमध्ये 596 संगणक आणि 76 प्रिंटर कम स्कॅनर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींचा निधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया प्लॅनसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही मीडियावर प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 7 हप्त्याचे पैसे जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. म्हणजेच एका महिलेला 1500 रुपयांप्रमाणं 10500 रुपये मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणपणे 2 कोटी 41 लाख महिलांना सातव्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष

1. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक.
2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

दरम्यान, ज्या महिलेच्या नावावर किंवा तिच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल त्या महिला या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: 'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
Bihar Election Result 2025: बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Pimpri Chinchwad Election : नगरसेवक व्हायचंय, मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष, धक्कादायक प्रकार
Raj Thackeray on BMC Election : मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवतीर्थावर आज मनसेची बैठक
Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर
Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: 'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
'जागतिक बँकेचा पैसा महिलांमध्ये वाटला', बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोरांच्या जन सूरजचा एनडीएवर गंभीर आरोप
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
आता आणखी एका देशाची तरुणाई सरकारविरोधात रस्त्यावर; राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाची संरक्षक भिंत उखडून फेकली; दगड, हातोडा, साखळदंड, काठ्यांनी पोलिसांवर 'प्रहार'
Bihar Election Result 2025: बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
बिहारी लालू यादव कुळीत वाद पेटवणारे हरियाणवी संजय यादव अन् यूपीमधील रमीज आहेत तरी कोण? दोघांच्या फ्रंट सीट 'तेजस्वी' कारभाराने यादवांमध्ये महाभारत!
Navi Mumbai :पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप; मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप
मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप; पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप
Rohini Acharya Quits Politics: राजदच्या पराभवानंतर लालू यादवांच्या घरात उभी फूट, बापासाठी किडनी दान करत बुलंद कहाणी झालेल्या लेकीनं थेट मध्यरात्री घर सोडलं!
राजदच्या पराभवानंतर लालू यादवांच्या घरात उभी फूट, बापासाठी किडनी दान करत बुलंद कहाणी झालेल्या लेकीनं थेट मध्यरात्री घर सोडलं!
Delhi Blast Al-Falah University: दिल्ली दहशतवादी हल्ल्यात आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या; थेट अल फलाह विद्यापीठाविरोधात दोन गुन्हे दाखल
दिल्ली दहशतवादी हल्ल्यात आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या; थेट अल फलाह विद्यापीठाविरोधात दोन गुन्हे दाखल
Indurikar Maharaj New Video: मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका, आता इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला!
मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका, आता इंदुरीकर महाराजांचा नवीन व्हिडीओ; म्हणाले, लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला!
Embed widget