Nashik News : नाशिक मनपा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, दिवस रात्र चालू होते कामकाज
Nashik News : नाशिक मनपा (Nashik NMC Election) निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध झाली असून नाशिक (Nashik) मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Nashik News : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या नाशिक (Nashik) मनपा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध (Voter List) झाली असून नाशिक मनपाच्या (Nashik NMC Election) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांना स्वतःसाठी आवश्यक असल्यास मतदार यादी खरेदी करता येणार आहे.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) सूचनेनुसार (दि. 21) नाशिक महापालिका प्रशासनाने एकूण 12 लाख 372 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. ऑनलाईन पद्धतीने तसेच विभागनिहाय यादी देखील प्रसिद्ध करून त्याची विक्री देखील सुरू करण्यात आली आहे. 6 लाख 29 हजार 682 पुरुष तर 5 लाख 70 हजार 636 महिला मतदार संख्या राहणार आहे. इतर 54 मतदार आहे.
नाशिक मनपा निवडणुकीच्या दृष्टीने 23 जून रोजी प्रमुख यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर तीन जुलै पर्यंत त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या या काळात तब्बल 3800 पेक्षा जास्त हरकती महापालिका प्रशासना प्राप्त झाल्या होत्या. यासाठी 44 विशेष पथकांची निर्मिती आयुक्तांच्या आदेशानुसार झाली होती तर प्रत्येक हरकतीची दखल घेतली स्थळ पाणी देखील करण्यात आली. यासाठी आयुक्त रमेश पवार, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील आदि अधिकाऱ्यांसह उपायुक्त तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विकत घेता येणार
अमान्य झालेल्या हरकती वगळून मान्य झालेल्या हरकती नुसार प्रारुप मतदार यादीत बदल करुन अंतिम मतदार यादया प्रसिध्द करण्यात आल्या. अंतिम मतदार याद्या नागरिकांना पाहणीसाठी विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन मुख्यालय येथे कार्यालयीन दिवशी व वेळेत पहाणीकरीता ठेवण्यात आल्या आहेत. आज अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्या राजीव गांधी भवन येथे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या मतदार यादीची किंमत प्रति पृष्ठ एक बाजु करीता रु.1.50 रुपये दोन्ही बाजू करीता रक्कम रुपये 3 या प्रमाणे एकुण पृष्ठाची होणारी रक्कम सर्वसाधारण पावतीव्दारे भरणा केल्यानंतर, उपलब्ध असल्यास त्याच दिवशी, नसल्यास छपाई करुन दुसऱ्या दिवशी निवडणूक विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतील.
तर नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी (दि. 21) रोजी महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर यादी फोटो विरहित आहे. ही यादी वरील संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. अंतिम मतदारयादीची फोटोसहित प्रत हवी असल्यास निवडणूक विभाग, शरणपूर रोड, राजीव गांधी भवन, नाशिक येथे शुल्क भरून कार्यालयीन वेळेत आपणास घेता येतील, अशी माहिती उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली आहे.