Nashik Dada Bhuse : दादा भुसेंचा लेक आणि सूनबाई चक्क शंकर-पार्वतीच्या वेशात, मालेगावात शिवपुराण कथा
Nashik Dada Bhuse : मालेगावच्या शिवपुराण कथेत अविष्कार भुसे व त्यांची पत्नी शंकर पार्वतीच्या वेशभूषेत दिसले.
Nashik Shivpuran Katha : मालेगावमध्ये (Malegaon) आयोजित करण्यात आलेल्या महाशिवपुराण कथेसाठी नाशिक (nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे चिरंजीव अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) आणि त्यांच्या सूनेनं शिवपार्वतीचा (Shiv Parvati) वेश परिधान केला होता. या वेशभूषेतील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वजण या जोडीचे कौतुक करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मागील पाच दिवसांपासून महाशिवपुराण (Mahashivpuran Katha) कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील पाच दिवसांत लाखो भाविकांनी शिवमहापुराण कथेचे श्रवण केले आहे. दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा (Pandit Pradip Mishra) यांच्या मालेगाव येथील शिवपुराण महाकथेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव शिवपूराण महाकथेत शंकर तर सुनबाई पार्वती व नातवाला गणेश यांची प्रतिकृती साकारली. यावेळी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील अविष्कार भुसे यांचे कौतुक केलंय. श्रीकांत शिंदे यांनी देखील महाशिवपुराण कथेसाठी मालेगावात हजेरी लावली होती.
प्रख्यात शिव महापुराण कथाकार परमपूज्य पंडित श्री. प्रदीप मिश्रा यांचा पुण्य श्री शिव महापुराण कथा महोत्सव मालेगाव येथे सुरु असून ,काल मालेगांव येथील शिवपुराण कथेचा आनंद आशीर्वाद घेण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, अजय बोरस्ते यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार शिंदे यांनी सनातन धर्म संतांच्या प्रबोधनाच्या आजच्या समाजाला गरज असून शिवपुराण महाकथेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रा ते काम करीत आहे. अशा प्रबोधनातून शास्त्र व सनातन धर्माचे संस्कार पुढील पिढीला मिळतील अशी प्रतिक्रिया त्यांनी मालेगाव येथे दिली.
महाकथेला लाखो भाविकांची हजेरी
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव शिव महापुराण कथेचे आयोजन केले असून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून सुरू असलेल्या या कथेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी खासदार शिंदे यांनी कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा व्यासपीठावर जाऊन सन्मान केला. साधू संतांनी शिकवलेल्या सनातन धर्माचे आचरण व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या मार्गक्रमण सुरू असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या महापुराण कथेस राज्यभरातून लाखो भाविक कार्यक्रमाला हजर राहून अतिशय श्रवण करीत आहेत.