![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Suicide : 'माझ्या मुलांना सांभाळा', आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ, सासरच्या छळाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन
Nashik Suicide : नाशिक (Nashik) शहराजवळ असणाऱ्या ओझर (Ojhar) येथील तरुणाने व्हिडिओद्वारे व्यथा मांडत विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.
![Nashik Suicide : 'माझ्या मुलांना सांभाळा', आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ, सासरच्या छळाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन maharashtra News Nashik youth suicide to get fed up with father in laws troubles in ojhar Nashik Suicide : 'माझ्या मुलांना सांभाळा', आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ, सासरच्या छळाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/eea2625958f501c379d84241895343fc1660466583078233_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Suicide : नाशिक (Nashik) शहराजवळ असणाऱ्या ओझर शहरातील (Ojhar) सोनेवाडी येथील एका 39 वर्षीय तरुणाने व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडत नंतर विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या ओझर परिसरातील सोनेवाडी येथे ही घटना घडली आहे. हिरामण अशोक लव्हान असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाने व्हिडिओमध्ये आपल्या सासरची मंडळी मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपली पत्नी, सासरा आणि मेहुण्याचं नाव घेत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सासरची लोक सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच बहिणीसाठी हा व्हिडिओ बनवत असून बहिणींने आईचा सांभाळ करावा असेही सांगितले आहे. तसेच आपल्या अंत्यविधीस आपल्या सारसच्या मंडळींना येऊ देऊ नये असे सांगतांना हिरामण लवांड यांना अश्रु अनावर झाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते आहे.
हिरामण लव्हाण आपल्या कुटुंबासह सोनेवाडी परिसरात वास्तव्यास होता. याच अपरिसरात राहणाऱ्या सासरच्या मंडळींकडून त्याला सतत टॉर्चर करण्यासह मारहाण करण्यात येत होती. बुधवारी त्याने शेतात जाऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. यामध्ये त्याने सासरच्या मंडळींची नावे घेत आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आणि स्वतःच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. काही वेळानंतर कुटुंबियांच्या ही बाबी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी टाहो फोडला.
दरम्यान संबंधित लव्हाण यांच्या बहिणीने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दखल करून भावाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. लव्हाण यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या घटनेने ओझर परिसरात खळबळ उडाली आहे. मयत हिरामण लवांड यांचा मुलगा ॠतिक लवांड याच्या फिर्यादीवरून पोलीसांनी हिरामण लवांड यांस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ओझर पोलीस करीत आहे.
आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ
लाव्हाण याने बुधवारी घराजवळ असलेल्या शेतात जाऊन आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला. यामध्ये तो म्हणतोय मी दारू न पिता आत्महत्या करतो आहे, आत्महत्याला कारणीभूत सासरा, मेव्हणा असून माझ्यासह माझ्या मुलाला या सर्वांनी टॉर्चर केलं असून मारहाण देखील केली आहे. माझ्या स्वतःच्या विहिरीत जीव देत असून हे सर्व माझ्या मरणाला कारणीभूत हे सर्वजण आहेत, असे या इसमाने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)