Nashik News : हुल्लडबाजीला 'ब्रेक', नाशिकच्या पर्यटन स्थळांवर 'नो एंट्री', अन्यथा कारवाई
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पहिने (Pahine), दुगारवाडी (Dugarwadi), हरिहर, भावली, ट्रिंगलवाडी, अंजनेरी (Anjneri) आदी पर्यटनस्थळे व गड किल्ल्यांवर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Nashik News : एकीकडे नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याला (nashik Nature) बहर आला आहे. मात्र दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणारे देखील वाढत चालले आहेत. यामुळे पर्यटनाला येणाऱ्या इतर पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच साल्हेरची घटनेमुळे नाशिक वनविभाग (Nashik Forest) आणि पोलीस प्रशासनाने (Nashik Police) जिल्ह्यात मुख्य पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे.
नाशिक जिल्ह्यात निसर्ग सौदंर्याने भरभरून दिले आहे. यंदाच्या पावसाळ्यातही हि पर्यटन स्थळे खुणावू लागली आहेत. यामुळे दरवर्षीं पावसाळ्यात राज्यभरातून हौशी पर्यटक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, वाघेरा हरसूल घाट, कश्यपी, पहीणे, इगतपुरीतील भावली डॅम परिसर आदी परिसरात हजारो पर्यटकांची गर्दी असते. विकेंडसह इतर दिवशी देखील गर्दीचा महापूर येत असतो. मात्र अलीकडच्या वर्षांत हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. एकीकडे त्या त्या पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त असूनही पर्यटक पोलिसांना ज जुमानता हुल्लडबाजी करताना दिसतात.
नाशिक शहर व परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हरिणी लावल्याने पर्यटनस्थळांवर पर्यटन प्रेमींची गर्दी वाढली आहे. परंतु अतिवृष्टी आणि पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय हुल्लडबाजी करणारे तरुण वाद विवाद करताना देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिक वन विभागाच्या पहिने, दुगारवाडी, हरिहर, भास्करगड, वाघेरा, भावली, ट्रिंगलवाडी, कुरुंगवाडी, अंजनेरी आदी पर्यटनस्थळे व गड किल्ल्यांवर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
साल्हेरवरील घटना
हौशी पर्यटक वर्षा सहलीच्या नावाखाली गडकिल्ल्यांच्या धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत अर्थात निर्बंध मुक्त झाल्यापासून नागरिकांचा उत्साह वाढणे स्वाभाविक आहे. परंतु यामुळे दुर्घटना वाढत असून साल्हेर किल्ल्यावरून (Salher Fort) पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अतिरेक थांबवण्यासाठी आता पोलिस आणि वन यंत्रणेने नागरिकांना तंबी दिली आहे. जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांसह धबधबे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी फिरकूच नका असे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले कि, नागरिकांनी पर्यटनस्थळी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, मद्य सेवन करत धिंगाणा घालणे, आदी प्रकार खपवून घेतले जाणार नाही. असे करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
