एक्स्प्लोर

5 New Tiger Cubs: वाघिणीला पाच बछड्यांसह घेरणं पडलं महागात, जिप्सी चालक, गाईडवर निलंबनाची कारवाई, नेमकं काय घडलं?

Sighting of tigress with 5 cubs in Tadoba: सध्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला (Umred Karhandla Wildlife Sanctuary) अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-2 वाघिणीला तिच्या 5 बछड्यांसह रस्तावर फिरत असताना तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीनं समोरून व मागून घेरलं होत. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे 4 चालक व 4 गाईड यांना 7 दिवसांसाठी निलंबित केलं आहे. 

तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे. मंगळवारी या जिप्सी चालकांनी व गाईडनी गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या 5 बछड्यांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळं पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनानं ही कारवाई केली आहे.

असा आहे नियम?

वाघापासून वाहनं 30 मीटर दूर असणं गरजेचं असतं, वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहनं कुठं थांबतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप बनविण्यात आला आहे. जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन 30 मीटर दूर असलं पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचं आहे.

सध्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला (Umred Karhandla Wildlife Sanctuary) अभयारण्यातील गोठणगाव जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. F- 2 (एफ-2) नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचं उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. F-2 वाघीण ही फेरी वाघिणीची मुलगी आहे. N-4 आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. नववर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटक नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाला भेट देत आहेत. या जंगलात वाघोबाचं हमखास दर्शन पर्यटकांना होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढू लागली आहे. ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरताना दिसली होती.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; आरोपीचं जरांगे कनेक्शन, प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; आरोपीचं जरांगे कनेक्शन, प्रशासनात खळबळ
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धसSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?Kolhapur Bank News : आठ वर्षांनंतरही आठ बँकांकडे 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा पडूनच, नोटा घेण्यास RBI चा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; आरोपीचं जरांगे कनेक्शन, प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; आरोपीचं जरांगे कनेक्शन, प्रशासनात खळबळ
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं!
Baban Gite & Walmik Karad: तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेसाठी बबन गित्तेची FB पोस्ट?
'हे' पदार्थ चुकूनही टिफिनमध्ये पॅक करू नका!
'हे' पदार्थ चुकूनही टिफिनमध्ये पॅक करू नका!
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
शिर्डीत डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प, भूमिपूजन संपन्न; तरुणाईला रोजगार मिळणार, बॉम्ब शेल्सची निर्मित्ती होणार
Embed widget