एक्स्प्लोर

मिर्झापूरमधील मुन्ना भैय्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, ‘मेरे देश की धरती’ चित्रपटात निभावणार हटके भूमिका

दिव्येंदूला विलनच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केलं मात्र यंदा एका वेगळ्या भूमिकेत तो दिसणार आहे.

मुंबई : ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापूर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये झळकलेल्या दिव्येंदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. मिर्झापूर या मालिकेतून मुन्ना भैय्याचं पात्र दिव्येंदू शर्मानं जोरदार गाजवलं. अगदी काहीच वर्षात आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मॉर्डन लूक व हातात कुदळ असलेला दिव्येंदूचा लूक असलेलं या चित्रपटातील एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दोन इंजिनिअर तरूण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी शेतकरी बनतात, याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्येंदू सांगतो की, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो.

आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्माने व्यक्त केली. दिव्येंदू शर्मासोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे. दिव्येंदूला विलनच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केलं मात्र यंदा एका वेगळ्या भूमिकेत तो दिसणार आहे, प्रेक्षकांचं प्रेम या भूमिकेलासुद्धा दिव्येंदू कितपत जिंकतोय हे येत्या काळातच कळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणीला सुरुवात; आग्र्याहून आणला, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार
मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणीला सुरुवात; आग्र्याहून आणला, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेंद्र मोदींची जंगलसफारी
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेंद्र मोदींची जंगलसफारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare On Ladki Bahin:8मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंधेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ताTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP MajhaManoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी दाखलCity 60 News : 03 March 2025 : सिटी सिक्स्टी सुपरफास्ट बातम्या : 03 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणीला सुरुवात; आग्र्याहून आणला, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार
मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणीला सुरुवात; आग्र्याहून आणला, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेंद्र मोदींची जंगलसफारी
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त नरेंद्र मोदींची जंगलसफारी
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Virar News : धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ 
धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Embed widget