DA Hike: होळीपूर्वी केंद्राचे कर्मचारी, पेन्शनधारकांना गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय होणार?
7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनर्सला मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन 56 टक्क्यांवर जाऊ शकतो.

DA Hike Today नवी दिल्ली: होळीपूर्वी केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचं गिफ्ट मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक होईल. या बैठकीत महागाई भत्ता वाढीसंदर्भातील निर्णय होऊ शकतो. महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन वाढून 56 टक्के केला जाऊ शकतो. आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेऊन जाहीर केला जाऊ शकतो.
केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याच्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स मिळून एक कोटी लोकांकडून केली जात आहे. सरकार या कॅबिनेट बैठकीत या बाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. मार्चला होळीचा सण आहे तर महिना अखेर रमजान ईद आहे. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनर्सला महागाई भत्ता म्हणजेच डीएमध्ये वाढ देऊ शकतं. महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो, अशी शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 53 टक्के आहे. तो वाढून 56 टक्के होऊ शकतो.
केंद्र सरकार एका वर्षात दोन वेळा 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनर्सला महागाई भत्ता देतं. पहिली वाढ जानेवारी ते जून या कालावधीसाठी तर जुलै ते डिसेंबर या काळात केली जाते. केंद्रीय कॅबिनेटमध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो. वाढवलेला महागाई भत्ता मार्चच्या पगारातून दिला जाऊ शकतो. तर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा फरक देखील सोबत मिळेल. महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल.
सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे, ज्यानुसार महागाई भत्ता वाढवला जातो. मात्र, सराकरनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. ज्याची समिती अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. 1 जानेवारी 2026 पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील तेव्हा तेव्हा महागाई भत्ता कशा प्रकारे द्यायचा आणि कसा वाढवायचा ते ठरवलं जाईल.
महागाई भत्ता कसा मोजतात?
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार 30000 रुपये महिना असेल आणि त्याचं मूळ वेतन 18000 असेल तर त्याला महागाई भत्ता 53 टक्के धरला तर 9540 रुपये मिळेल. आता त्यामध्ये 3 टक्के वाढल्यास महागाई भत्ता 10080 रुपये मिळेल.
इतर बातम्या :
























