एक्स्प्लोर

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो?

प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया.

मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील पायलट, को-पायलट, तंत्रज्ञ या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं. LIVE मुंबईत भर वस्तीत विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो. ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो. जुहूवरुन उड्डाण ते घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय घडलं? विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो. ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात  नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं. हजारोंचे प्राण वाचवले, महिला वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला? ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅण्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्याने कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आणखी एक झटका, आता थेट ईडीची एन्ट्री, सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळला
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, आता थेट ईडीची एन्ट्री, सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळला
समुद्रात अडकलेल्या जहाजावर चोरी करायला गेले, चार जण जीव गमावून बसले, नेमकं काय घडलं?
समुद्रात अडकलेल्या जहाजावर चोरी करायला गेले, चार जण जीव गमावून बसले, नेमकं काय घडलं?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Embed widget