एक्स्प्लोर
Reliance Industries : रिलायन्सचा नफा वाढला, मार्चच्या तिमाहीत नफा 19000 कोटींवर, आकडेवारी जाहीर, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, लाभांश जाहीर
Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जानेवारी ते मार्च 2025 या तिमाहीच्या कामगिरीची आकडेवारी जाहीर झाली आहे. रिलायन्सचा निव्वळ नफा वाढला आहे.
रिलायन्सचा नफा वाढला
1/5

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे जानेवारी-मार्च 2025 तिमाहीचे निकाल आले आहेत. रिलायन्सचा या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 2.4 टक्के वाढून 19407 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी नफा 18591 कोटी रुपये होता. एकत्रितपणे महसूल वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 264573 कोटी रुपये झाला आहे तर गेल्या वर्षी 240715 कोटी रुपये होता.
2/5

रिलायन्सचा खर्च वाढून 240375 कोटी रुपये झाला आहे. जो गेल्या वर्षी मार्च 2024 च्या तिमाहीत 217529 कोटी रुपये होता. 2024-25 या आर्थिक वर्षात रिलायन्सचा महसलू 980136 कोटींवर पोहोचला आहे. यापूर्वी तो 914472 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर निव्वळ नफा 69648 कोटी रुपये झाला आहे. तो गेल्या आर्थिक वर्षात 69621 कोटी रुपये होता.
3/5

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आर्थिक वर्ष 2024-25 साठी 5.50 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय आगामी काळात 25000 हार कोटींची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नॉन कनवर्टेबल डिबेंचर जारी करेल.
4/5

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात जागतिक व्यावसायिक वातावरण आव्हानात्मक राहिल्याचं म्हटलं.
5/5

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1300.05 रुपयांवर बंद झाला. कंपनीचं बाजारमूल्य 17.59 लाख कोटींवर पोहोचलं आहे. कंपनीत प्रमोटर्सची भागीदारी 50.11 टक्के आहे. गेल्या 2 आठवड्यात शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Apr 2025 09:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























