Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. राज्य सरकारच्या शोधमोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक असून फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्रं आहेत. तर राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
बीड जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित
बीड ब्रेक: जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित
दक्षता पथकाच्या तपासणी दरम्यान आढळला होता गैरप्रकार
अहवाल आल्यानंतर आज निलंबनाचे आदेश
वाल्मीक कराडसह संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात
कारागृह प्रशासनावर आरोप झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून गंभीर दखल
वारंवार केली जात आहे तपासणी
सीमा गोरे असं निलंबित झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तर डी.डी. कवाळे असे वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याचे नाव
डी.डी.कवाळे यांनी नुकताच स्वीकारला होता पदभार
महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळ वीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त : नाना पटोले यांचा टोला
महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळ वीर... भाजपा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करताय...पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त : नाना पटोले यांच्या टोला....
Anchor : महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारला गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदारकडे जाऊन त्यांच्या धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावा असे वक्तव्य केले होते . त्याच्या समाचार घेत असताना काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भाजपाने आपल्या वाचाळवीरांना पहावं. एका बाजूला नरेंद्र मोदी एक है तो सेफ आहे असे नारे देतात. असे वक्तव्य करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा करीत आहेत. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहेत. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं त्याने सहकार्य केलं. एवढेच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजाने पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे दिले. ज्याप्रमाणे भाजपाचे खासदार, मंत्री वागत आहेत हे चुकीचे असल्याचे नाना पटोले म्हणाले. उलट राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मात्र पंतप्रधान यांनी याकडे दुर्लक्ष करीत मात्र बिहारच्या निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यात करीत असल्याचा टोला यावेळी नाना पटोले यांनी लगावला. उलट इंदिरा गांधींनी अशा प्रकारच्या हल्ला जेव्हा भारतावर झाला त्यावेळेस लाहोर मध्ये जाऊन पाकिस्तानची विभागणी केली. परंतु हा आपल्या देशावर हमला आहे आणि या हमल्या विरुद्ध काँग्रेस ही सरकारच्या सोबत असल्याची भूमिका नाना पटोले यांनी मांडले.....
: नाना पटोले ऑन नितेश राणे
2)राजीनामा च्या बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी निर्णय घ्यावा... जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी ...नाना पटोले यांच्या अमित शहा यांना टोला....
गेंड्याच्या कातडीच्या सरकार....नाना पटोले....
एका बाजूला संजय राऊत हे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामा मागत आहेत तर शरद पवार यांनी दहशतवादी विरोधी धोरण ठरवावे असे वक्तव्य केले यावरून गृहमंत्री शहा यांच्या राजीनामाच्या विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की ज्याप्रमाणे देशाची माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कार्य काळामध्ये अशा घटना झाल्या अशा नेत्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे त्यामुळे "जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी"अशी भूमिका काँग्रेसची आहे. पण ज्यांना सत्ताच पाहिजे गेंद्याच्या कातडीची सरकार असलेले लोक आहेत. झालेल्या घटनेची चूक लक्षात घेऊन याबाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा. मात्र ज्याप्रकारे देशावर हल्ला झाला आहे त्याला उत्तर देणे फार गरजेचे आहे जेणेकरून पुढे देशावर असं कोणत्याही प्रकारचा हमला होणार नाही अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदिया जिल्ह्यात येथे केले....
:- नाना पटोले ऑन अमित शहा राजीनामा
3)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावं ....नाना पटोले...
Anchor :- धर्म विचारुन मारलं का याबाबतचं सत्य माहित नाही असं पवार म्हणाले. आधीच्या घटनांमध्ये धर्मावरुन चर्चा नव्हती आता चर्चा का असा सवालही त्यांनी केला.. तर पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला फडणवीसांनी दिलाय यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की त्यांच्या आत्ता परिवारांना विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी त्याच्या खरा दोषी कोण.. याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला. भाजपाने जो विभाजन वाद निर्माण केला त्याची फळ आम्हाला भोगावे लागत आहे अशी जनमानसाची भावना आहे. यामध्ये आम्हाला पळायचे नाही अशी भूमिका काँग्रेसची आहे. मात्र या घटनेच्या जशास तसे उत्तर द्यावे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले....























