एक्स्प्लोर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरेंना सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवण्याच्या हालचाली? त्या बॅनर्समुळे चर्चांना उधाण
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनोमिलन होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याविषयी सकारात्मक वक्तव्य केले आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray
1/8

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
2/8

या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये लागलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत. ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या या फलकावरचा मजकूर लक्ष वेधून घेत आहे.
3/8

राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण द्या, असं साकडं या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना घालण्यात आले आहे.
4/8

शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी हे फलक लावले आहेत.
5/8

राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणे बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते.
6/8

उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती.
7/8

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलतील.
8/8

राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. परदेशातून परतल्यानंतर राज ठाकरे यांसदर्भात काही महत्त्वाची घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published at : 21 Apr 2025 11:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























