एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
राक्षसी कृत्याच्या 7 घटना, 10 जणांनी जीव गमावला; पहलगाम हल्ल्यातील काळीज पिळवटणाऱ्या सत्यकथा
जम्मू आणि काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला.
Pahalgam terror attack 7 incident
1/10

जम्मू आणि काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला.
2/10

गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मृतांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला असून हल्लेखोरांना सोडणार नाही, अशा शब्दात अमित शाह यांनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय. तसेच, कुटुंबीयांचे सांत्वनही केले.
3/10

पहलगामा येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी अशी मयतांची नावे आहेत. हे तिघेही एकमेकांच्या नातेवाईक असून नेहमी डोंबिवली शहरातील बाग शाळा मैदाना त एकत्र भेटायचे याच मैदानात ते मॉर्निंग वॉक देखील करायचे एवढेच नव्हे तर लेले आपल्या मित्रांसोबत क्रिकेट देखील खेळायचे.
4/10

त्यांच्या मृत्यूची बातमी डोंबिवलीत पसरल्यानंतर सर्वत्र सुखाचा सावट पसरले असून त्यांचा मृतदेह देखील याच मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व याच मैदानापासून त्यांचे अंत्ययात्रा देखील निघणार आहे. तर या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
5/10

हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवालांचं सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनला गेले होते. भेळपुरी खाताना अतिरेक्यांनी धर्म विचारुन विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या.
6/10

दहशतवाद्यांनी उ.प्रदेशातल्या शुभम द्विवेदीलाही पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभम कुटुंबीयांसह 11 दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडल्या. मलाही गोळ्या घाला असं त्याची पत्नी एशान्या म्हणत होती. मात्र, हम आप को मारेंगे नहीं, आप सरकार को जाकर बताओ, असं उत्तर अतिरेक्यांनी दिलं.
7/10

इंदूरच्या सुशील नथानियल यांना देखील अतिरेक्यांनी कुटुंबीयांसमोर गोळ्या घातल्या. नथानियल यांची मुलगी आकांक्षाही गोळीबारात जखमी झाली आहे. सुशील नथानियल हे पत्नी, मुलगा, मुलीसह चार दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेले होते. पण तिथेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.
8/10

रायपूरच्या एका उद्योगपतीला लग्नाच्या वाढदिवसालाच दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या. रायपूरच्या दिनेश मिरानियांना दहशतवाद्यांनी पत्नीसोबत फोटो काढताना गोळ्या घातल्या. पत्नी, मुलगा, मुलीसमोर दिनेश मिरानियांची अतिरेक्यांनी हत्या केली.
9/10

बिहारच्या मनीष रंजन यांचीही कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पत्नी आशादेवी आणि दोन मुलांसमोर मनीष यांना गोळ्या घालण्यात आल्या. पत्नी आणि दोन्ही मुलं सुरक्षित आहेत. मनीष रंजन हे आयबी ऑफिसर आणि हैदराबादेत सेक्शन ऑफिसर आहेत.
10/10

अतिरेक्यांनी भावनगरच्या पिता-पुत्राला आणि मित्राला गोळ्या घातल्या. गुजरातचा 20 जणांचा ग्रुप काश्मीरला सहलीला गेला होता. यतीशभाई आणि त्यांचा मुलगा स्मित यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांनी यतीशभाई आणि स्मितची हत्या केली आणि पत्नी काजलबेनला सोडले.
Published at : 23 Apr 2025 07:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























