Pahalgam Terror Attack: बंदूकें भिजवा दी हैं, ब्रेक फेल नहीं हो पाया! पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेलचा खळबळजनक दावा, प्लॅन ए फसला?
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचं त्या मॉडेलसोबत गैरवर्तन, स्तनांना हात लावला, कुराण आणि रुद्राक्षाच्या माळेवरुन वाद. खेचर स्वार आणि त्याच्यासोबतच्या लोकांच्या हालचाली संशयास्पद

Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पसार झालेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सध्या भारतीय लष्कराने (Indian Army) मोहीम हाती घेतली आहे. या दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काश्मीरला फिरायला गेलेल्या एका मॉडेलने आपण या दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा केला आहे. मॉडेल एकता तिवारी (Ekta Tiwari) हिने या दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते, असा दावाही केला.
एकता तिवारी हिने सांगितले की, आमचा 20 जणांचा ग्रुप 13 एप्रिलला काश्मीरमध्ये फिरायला गेला होता. आम्ही काश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागात फिरत होतो. 20 एप्रिलला आम्ही पहलगामला पोहोचलो. त्यादिवशी आम्हाला आमच्यासोबत असणारा खेचरांचा मालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. एकता तिवारी यांना या खेचर स्वारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांचा व्हिडीओही शुट करुन ठेवला होता. ते आम्हाला कुराण का वाचत नाही, असे विचारत होते. तसेच माझ्या भावाच्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ पाहून त्याने वाद घातला होता. हा खेचर स्वार पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रातील दहशतवाद्याशी मिळताजुळता असल्याचा दावा एकता तिवारी हिने केला आहे.
या खच्चर स्वारासोबत दोन अनोळखी लोकही होते. ते मला अजमेर दर्ग्याविषयी विचारत होते. मग त्यांनी मला अमरनाथ यात्रेविषयी विचारले. तुम्ही किती लोक आहात, कोणत्या धर्माचे आहात, असे प्रश्न ते सतत विचारत होते. त्या लोकांना आम्हाला बैसरन व्हॅलीत न्यायचे होते. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आम्ही बैसरन व्हॅलीला जाण्याआधीच थांबलो. त्यानंतर त्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली. आमच्याकडे त्याचे व्हिडीओ आहेत. एकता तिवारी यांनी सीएम हेल्पलाईन 1076 या क्रमांकावर फोन करुन ही माहिती पोलिसांना दिली.
दहशतवादी म्हणाला, प्लॅन ए फेल झाला
एकता तिवारी यांनी सांगितले की, आमचा खच्चर स्वार हा दहशतवादी असू शकतो. त्याच्याकडे एक लहानसा किपॅडवाला फोन होता. तो वारंवार या फोनवर बोलत होता. बोलून झाल्यावर तो फोन बुटाजवळील मोजात लपवत होता. मी त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तो खोऱ्यात 35 बंदुका पाठवण्यासंदर्भात बोलत होता. यावेळी त्याने फोनवर कोणालातरी प्लॅन ए फेल झाल्याचेही सांगितले. ब्रेक फेल झाले नाहीत. हा त्यांचा प्लॅन ए होता. त्यामुळे बैसरन व्हॅलीतील हल्ला हा दहशतवाद्यांचा प्लॅन बी असावा, असा संशय एकता तिवारी यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
भारताचं युद्धाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल, शस्त्रसंधी करार रद्द करणार आणि पाकिस्तानला थेट भिडणार?























