Shani Gochar 2025 : तब्बल 27 वर्षांनंतर शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणार प्रवेश; 'या' 3 राशींचे टेन्शन होणार खल्लास, मिळणार बंपर लाभ
Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. शनीचं नक्षत्र परिवर्तन 28 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी होणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानलं जातं. शनी (Lord Shani) देव एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. शनीच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या लोकांवर होतो. शनी जवळपास अडीच वर्षांनंतर राशी आणि एक वर्षांनंतर नक्षत्र परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. शनीचं नक्षत्र परिवर्तन 28 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी होणार आहे. शनीचं नक्षत्र परिवर्तन उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. तर, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी नक्षत्र परिवर्तन होणार आहे. याचा सर्व 12 राशींवर परिवर्तन होणार आहे. शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या अष्टम चरणात शनी स्थित असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक चांगले बदल दिसून येतील. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकाल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे प्रॉपर्टीच्या संदर्भातील वाद लवकरच सुटतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. नशिबाचे दार तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, या कालावधीत पैशांची देवाण-घेवाण सावधानतेने करण्याची गरज आहे. जोडीदाराबरोबर चांगला काळ जाईल.तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणाचा स्वामी शनी आहे. त्यामुळेच शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, वैवाहिक जीवनात तुमचा आनंद टिकून राहील. जोडीदाराबरोबर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















