CSK vs SRH IPL 2025: अस्तित्वाच्या लढाईत हैदराबाद सरस

CSK vs SRH IPL 2025: काल झालेल्या चेन्नई विरुद्ध हैदराबाद संघांमधील सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवून तांत्रिक दृष्ट्या स्पर्धेतील आपले अस्तित्व कायम ठेवले. नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला...सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शेख रशीद शम्मी च्या एका अप्रतिम आउट स्विंग डिलिवरी वर बाद झाला...त्यांनंतर आज सुद्धा मुंबईकर आयुष अप्रतिम खेळून गेला..त्याने सॅम करन सोबत २७ चेंडूत ३९ धावांची भागीदारी करून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला... सेम करण आणि आयुष् पाठोपाठ बाद झाल्यावर या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणारा ब्रेविस मैदानात आला. ..त्याची ओळख बेबी एबीडी अशी का आहे हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिले...त्याची फटक्यांची रेंज मोठी आहे...आणि तो वेगवान आणि स्पिन गोलंदाजी सारख्याच कौशल्याने खेळतो .आज त्याने २५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली...आणि त्यात त्याने ४ षटकार लगावले...चेन्नई च्या सपूर्ण डावात ६ षटकार आहेत...त्यात ब्रेविस चे एकट्याचे ४ यावरून षटकार मारण्याचे त्याचे कौशल्य समजून येते...दुर्दैवाने ब्रेविस चा मेंडीस ने लाँग ऑफ सीमा रेषेवर एक अप्रतिम झेल घेतला...या स्पर्धेतील तो कदाचित सर्वोत्कृष्ट झेल असेल..झेल सुटण्याची या स्पर्धेची परंपरा आज सुद्धा कायम राहिली...त्यात मेंडीस ने हवेत सूर मारून घेतलेला हा झेल आनंद देऊन गेला.
२० षटकात १५४ धावा चेन्नई संघ जमवू शकला...त्याचे कारण देताना धोनी म्हणाला की आम्ही खराब फलंदाजी केली..खेळपट्टी जरी मंद असली तरी १५४ धावा या पुरेशा नव्हत्या...हैदराबाद संघाकडून हर्षल पटेल याने ४ बळी घेतले....त्याने आपल्या गोलंदाजीत लाईन आणि लेन्थ मध्ये सातत्य ठेवले... गोलंदाजीत काही कमी वेगात चेंडू सोडणे यात त्याचा हातखंडा आहेच..आज त्यात त्याला खेळपट्टीने साथ दिली....१५५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला हैदराबाद संघाची सुरुवात सुद्धा अडखळत झाली. अभिषेक शर्मा खालील च्या गोलंदाजीवर कव्हर मध्ये शून्यावर बाद झाला...हेड अडखळत खेळत असताना कंबोज ने एका अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उध्वस्त केला.. कंबोज आणि पथ्थीराणा जेव्हा एकत्र खेळत असतात तेव्हा दोघांच्या ऍक्शन पाहून ते वेगवेगळ्या ग्रहावरचे गोलंदाज वाटतात..
मागील सामन्यात चर्चेतील खेळाडू ईशान आज महत्त्वपूर्ण ४४ धावा करून गेला...त्याने हेड आणि अनिकेत सोबत महत्वपूर्ण भागीदारी करून हैदराबाद संघाच्या डावाला आकार दिला...हैदराबाद संघ अडचणीत येईल असे वाटत असताना मेंडीस ने २२ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळून हैदराबाद संघाचा विजय सुकर केला...आजची लढत स्पर्धेतील इतर संघांच्या वाटचालीवर परिणाम करणारी जरी नसली..तर ही अस्तित्वाची लढाई होती ..त्यात पॅट कमिन्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बाजी मारली.. चेन्नई आणि हैदराबाद हे दोन्ही संघ तांत्रिक दृढ्या स्पर्धेबाहेर आहेत...पण त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत ते काही संघांचे अस्तित्व संपवू शकतात...इतकी ताकद या दोन्ही संघात आहे...दोन्ही संघांचे मिळून १० सामने शिल्लक आहेत..त्यात मुंबई संघाविरुद्ध दोन्ही सामने झालेले आहेत....गुणतालिकेत वरच्या स्थानावर असणाऱ्या कोणत्या तरी संघाचे गणित हे बिघडवू शकतात...इतके मात्र नक्की.
हा लेखही वाचा:
RR vs RCB, IPL 2025: उंच हेझल,चिरतरुण विराट आणि बंगळूर सुसाट

























