एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का गेले नाहीत? खरं कारण आलं समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत? या बाबत स्वता: ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण देत भाष्य केलंय.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) नवी दिल्लीत सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.दरम्यान, या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत? या बाबत स्वता: ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut)  आणि अरविंद सावंत हे दोन्हीही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT)  खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितलंय. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र ही विनंती नाकारत बैठकीनंतर यावर विस्तृत चर्चा करण्याचं सरकारकडून स्पष्टीकरण  दिले असल्याचे ही त्यांनी सांगितलं.

किरण रिजीजू यांच्याकडून निरोप आला, पण....  

पहलगाममध्ये जी घटना घडली तिचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला काल (24 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजता सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारने बोलावली आहे, असा निरोप किरण रिजीजू यांच्याकडून आला, त्यांनी फोन केला होता. त्यांना मी सांगितलं की मी बाहेरगावी लोकसभेच्याच ज्या आमच्या स्टॅंडिंग कमिटी असतात त्यांच्या दौऱ्यावर आहे आणि सध्या ज्या ठिकाणी आहे तिथून पोहोचणे कठीण आहे. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना सांगा म्हणून बोलले. पण संजय राऊत सुद्धा याच पार्लमेंटरी स्टॅंडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्यावेळी आम्ही दुसऱ्या कोणत्या खासदाराला या बैठकीला आमच्याकडून पाठवू का? असं विचारले असता, त्यावेळी त्यांनी सांगितलं की दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजे.असे ते म्हणाले असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

केंद्र सरकार जी काही पावलं उचलेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा-  अरविंद सावंत

 या सगळ्यानंतर मी त्यांना एक पत्र आणि मेसेज केला. त्यामध्ये गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्ही या बैठकीला उपस्थित राहू शकतो का? असे विचारलं. मात्र त्यावर किरण रिजीजू त्यांनी या बैठकीनंतर यावर सविस्तर बोलेल असं सांगून धन्यवाद केलं. मात्र तिकडे शिवसेना अजूनही काही लोकांनी ओळखली नाही आणि काही लोकांना याचे राजकारण करायचं आहे. आम्ही अंगावर खेळणारी लोक आहोत अंगावरून झटकणारे नाहीत. असे घाणेरडे आरोप करणं आणि त्यावरून राजकारण करण हे चुकीचं आहे. वस्तुस्थिती कळावी म्हणून ही माहिती दिली  केंद्र सरकार जी काही पावलं या सगळ्या घटनेनंतर उचलेल त्याला आमचा पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा असेल. आम्ही काही प्रश्न सुरक्षित संदर्भात उपस्थित केली आहेत असेही खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावेळी सांगितलंय.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Embed widget