नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार; माजी सभापतीसह 16 सरपंच, 6 नगरसेवकांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
Nagpur News : नागपूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

Nagpur News : नागपूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपराजधानीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. यात जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे यांच्यासह 16 सरपंच, 6 नगरसेवक आणि 12 कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस
यावेळी बोलताना, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार गटाचे अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वलाताई बोढारे, 18 सरपंच, 90 ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आज आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपचा होईल. कारण काही मतं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रमेश बंग यांना मिळाली होती, त्या सर्व मतांचा भला मोठा गठ्ठा भाजपमध्ये ऍड झालाय, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर त्यांची युती केली तर....
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे, महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीवर अधिक बोलणे टाळले आहे.
मतांच्या लांगूलचालना करिता शरद पवारांनी असं करू नये- चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, शरद पवार साहेबांनी अशी वक्तव्य करू नये, ज्याच्या घरी जीव गेला त्यांच्याशी भेट घ्यावी, एवढा मोठा राष्ट्रावर आघात झाला आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या कुटुंबाला काय विचारलं हे पहावं, एकातरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले आहेत का? त्यांना विचारलं का काय झालं म्हणून? मतांच्या लांगूलचालना करिता शरद पवारांनी असं करू नये, असा सल्ला देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























