एक्स्प्लोर
हंडाभर गढूळ पाण्यासाठी 'लाडक्या बहिणी'ची वणवण; कुठंय मिशन 'जल'जीवन? पाहा फोटो
एकीकडे राज्य सरकारकडून मिशन जलजीवन, जलयुक्त शिवार, हर घर नल अभियान राबवून पाणीप्रश्न कायमचा संपविण्यात येत असल्याचे सांगितले जाते
Nashik drought women video viral for water
1/8

एकीकडे राज्य सरकारकडून मिशन जलजीवन, जलयुक्त शिवार, हर घर नल अभियान राबवून पाणीप्रश्न कायमचा संपविण्यात येत असल्याचे सांगितले जाते
2/8

मात्र, महाराष्ट्रात आजही पाण्यासाठी अत्यंत भयानक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात यवतमाळमधील 12 वर्षीय वेदिकाने पाण्यासाठी भटकंती करताना जीव गमावला होता
3/8

आता, नाशिक जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून हंडाभर गढूळ पाण्यासाठी या महिला चक्क आपला जीव टांगणीला ठेऊन पाणी मिळवत आहेत.
4/8

नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातलं बोरिचिबारी हे गावातला हा व्हिडिओ व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
5/8

लाडक्या बहिणींना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमिटर पायपीट करावी लागत असून महिलांची मोठी गर्दी येथील एका विहिरीवर दिसून येत आहे.
6/8

घरातली सगळी कामं सोडून पाण्यासाठी या महिलांची भरउन्हात वणवण होतेय, एवढी वणवण करुनही पाणी मिळेल याची कुठलीही खात्री नाही.
7/8

काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ज्यांचं राजकारण केवळ लाडकी बहिण योजना आणि जलयुक्त शिवारच्या जाहिरातींवर चालतं, त्यांनी आता डोळे उघडून पहावं, असे पाटील यांनी म्हटलं.
8/8

महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. पाण्यासाठी कित्येक मैल पायपीट करणाऱ्या आणि अनेक फूट खोल विहिरीत उतरणाऱ्या महिला सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय? सरकारने फक्त योजना आणल्या पाणी नाही, असेही सतेज पाटील यांनी म्हटलं.
Published at : 21 Apr 2025 05:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























