Crime News : जुना राग अन् संतापाची धगधगती आग; 17 वर्षीय मुलाला वार करून संपवलं, जंगलात आढळला मृतदेह, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली अन्...
Crime News : पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.

Crime News : नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील वाखारी शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे (१७, रा. बोधे) या युवकास पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत गळा चिरून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) या घटनेची माहिती मिळताच चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे. मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातील (Wakhari Shivar) जंगलात युवकाचा मृतदेह आढळला आहे.
खून झालेल्या रवींद्र अहिरे याचे बडील दीपक आहिरे (42) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) दाखल केलेल्या फिर्यादीत स्वींद्र ऊर्फ मुन्ना दीपक आहिरे (17, रा. बोधे दहिवाळ, ता. मालेगाव) यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून मुलास जिवे ठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर रवींद्र अहिरे याला जिवे ठार मारण्याकरता त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून मुलाचा खून करून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे नमूद केले आहे.
चार संशयितांना ताब्यात घेतले
या खुनाची पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी नांदगाव पोलिसांना (Nandgaon Police) माहिती दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुनील बढे तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याने हल्लेखोरांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत रवींद्र अहिरे याचा खून करणाऱ्या चार संशयित हल्लेखोरांना शिताफीने अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























