एक्स्प्लोर

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित, एफईओ कायद्याचा दणका

पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीला गुरुवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीला गुरुवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. यापूर्वी विजय मल्याला या नव्या कायद्याचा दणका बसला आहे. त्यापाठोपाठ आता नीरव मोदी या दुसरा फरार आर्थिक गुन्हेगार ठरला आहे. पीएनबी बँकेतील गैरव्यवहाराबाबत नीरव मोदीला फरार आर्थिक आरोपी घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज सक्तवसुली संचालनालयाकडून विशेष न्यायालयात करण्यात आला होता. त्यावर न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील गैरप्रकांरांची माहिती आरोपीला असावी आणि त्यामुळेच ऐनवेळी तो देशाबाहेर फरार झाला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. साल 2017 पर्यंत त्याची वागणूकही तपसायंत्रणेला संशयास्पद वाटत होती. ईडीच्या वतीने आतापर्यंत अनेकदा त्याला समन्स बजावले. मात्र त्याने भारतात येण्यास नकार दिला. दरम्यान, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानेही त्याला फरार गुन्हेगार घोषित करण्याची कारवाई सुरू केली आहे. 15 जानेवारी 2020 पर्यंत न्यायलयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यामुळे आरोपीच्या मालमत्तेवर तपासयंत्रणा टाच आणू शकते आणि त्यासाठीचे सर्व अधिकार तपासयंत्रणेकडे असतात. नीरव मोदीची सुमारे 1300 कोटींची मालमत्ता ईडीने ताब्यात घेतली आहे. नीरव मोदीला सध्या लंडनमध्ये अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, पीएनबी घोटाळ्यातील दुसरा मुख्य आरोपी मेहुल चोक्सीलाही कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने चोक्सीविरोधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत यासंदर्भातील खटल्यातील साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यासाठी आरोपीने मागितलेली परवानगीही कोर्टानं नाकारली, मात्र चोक्सीची याचिका हायकोर्टाने अद्याप प्रलंबित ठेवली आहे. 'नव्या कायद्यानुसार आरोपींना दाद मागण्याची फार कमी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार आरोपीविरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही जेणेकरून अशा आर्थिक गुन्हेगारांविरोधातील तपासयंत्रणेच्या कामात अडथळे येतील', असे खंडपीठाने अधोरेखीत केले आहे. मेहुल चोक्सी हा एक फरार आर्थिक गुन्हेगार असून अजामीनपात्र वॉरंट बजावूनही हो देशात परत येऊन तपासयंत्रणेपुढे हजर होत नाही. यावरून तो गुन्हेगारच आहे हे सिद्ध करण्यास आणखीन नवा पुरावा कशासाठी हवा? असा ईडीनं हायकोर्टात दावा केला होता. मेहुल चोक्सीनं फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत केलेली आहे. तसेच या याचिकेत चोक्सीनं ईडीनं ज्या साक्षीदारांच्या जबानीवर त्याला फरार आर्थिक गुन्हेगार ठरवण्यात आलं आहे, त्यांची उलटतपासणी घेण्याची मागणीही कोर्टाकडे केली होती जी कोर्टानं फेटाळून लावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
RBI Polymer Notes: आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Embed widget