एक्स्प्लोर
Advertisement
वरळीत स्लॅब कोसळून पोलिस पत्नी गंभीर जखमी
मुंबईतील वरळीमध्ये पोलिस वसाहतीत छताचा स्लॅब कोसळून पोलिसाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
मुंबई : एकीकडे शहर सुरक्षित राहावं यासाठी मुंबई पोलिस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतो, पण पोलिसांचं कुटुंबच कितपत सुरक्षित आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. वरळीतील पोलिस वसाहतीत छताचा स्लॅब कोसळून पोलिसाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
पोलिस ज्या घरात राहतात, ती जास्तीत जास्त दोनशे स्क्वेअर फुटांची आहेत, पण त्यातही ती मोडकळीस आलेली आहेत. याचाच फटका पोलिस कुटुंबीयांना बसत असल्याचं वारंवार समोर येत आहे. बीडीडी चाळ क्रमांक 28 पोलिस वसाहतीत एका महिलेवर स्लॅब कोसळून ती गंभीर जखमी झाली. वंदना कदम असं जखमी महिलेचं नाव आहे.
इंग्रजांच्या काळापासून असणाऱ्या या बीडीडी चाळींच्या दुरुस्तीचं काम पीडब्ल्यूडी विभागाकडे आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
मुंबईकरांना काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका चांगलाच बसला. वडाळ्यात भिंत पडली, तर काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली. त्यात वरळीच्या पोलिस वसाहतीमधली घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement