Aslam Shaikh : अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, बंदर विकास कामात घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप
माजी मंत्री अस्लम शेख यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात बंदर विकास कामांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : बंगले आणि स्टुडिओशी संबंधित आरोपांनंतर आता अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर आता बंदर कामातील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात अस्लम शेख यांनी बंदरांच्या कामात घोटाळा केल्या असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या प्रकरणी तपास करण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.
माजी मंत्री अस्लम शेख हे ईडीच्या (ED) चौकशीच्या रडारखाली असल्याचा दावा यापूर्वीच्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यांनी केला होता. यानंतर अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली असल्याची माहिती समोर आली. या दोन नेत्यांची भेट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली असल्याची माहिती समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील बंदरांशी संबंधित काही कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील काही बंदरांशी संबंधित अनियमिततेची चौकशी करणारी एजन्सी या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
मढ, मार्वेतील फिल्म स्टुडिओ घोटाळ्याचा आरोप
काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावर या आधी मढ, मार्वेतील फिल्म स्टुडिओच्या (Madh Marve Studio Case) कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. मढ, मार्वेमध्ये 49 फिल्म स्टुडिओमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसंच यामध्ये CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
- Gambia : गॅंबियातील 66 मुलांचा जीव घेणाऱ्या कफ सिरपची भारतात विक्री नाही, भारत सरकारकडून स्पष्टीकरण
- अनिल देशमुख लवकरच तुरुंगाबाहेर? 14 ऑक्टोंबरपर्यंत जामीनावर उत्तर देण्याचे सीबीआयला निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
