एक्स्प्लोर

कोरोना काळातील 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी BMC अधिकाऱ्याला ईडीची नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

BMC COVID Center Scam: कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

BMC COVID Center Scam: कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच संदर्भात मुंबई महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ईडी कडून नोटीस आल्याचा दावा, किरीट सोमय्या यांनी केला आहे... हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं असल्याचे त्यांनी सांगितले... काय आहे हे संपूर्ण प्रकरण ? आणि बीएमसीच्या कोणत्या अधिकाऱ्याला ईडीची नोटीस पाठवली आहे ? 

कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच भाजपने ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे... 

या कंपनीने जून 2020 ते मार्च 2022 पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीए चे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या  विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला...

आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसी कडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले... मात्र बीएमसी कडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी ईडी ने नोटीस पाठवली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय.

या प्रकरणात आरोप काय आहेत ?

कोरोनामध्ये मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं... 

शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे.

ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे...कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर ,संजय शहा ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत.  

या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर साहेब ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राट मधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आलं. 

सदर कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिली असेल निदर्शनास आलं त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करून 25 लाख रक्कम जप्त केली.

त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली.

त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आले.

आता यावर मुंबई महापालिका आयुक्तांनी या सगळ्यांची जबाबदारी घेऊन या आरोपांवर उत्तर द्यावीत, ईडी चौकशीला सामोरे जावे, शिवाय याआधीच्या सरकारमध्ये कोणाच्या सांगण्यावरून हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले हे सुद्धा समोर यावं अशी मागणी मनसेने केलीये. एकीकडे बीएमसीच्या कोरोना काळातील व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू असताना आता यात कोव्हीड सेन्टर घोटल्याच्या आरोपाखाली ईडी कडून बीएमसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी केली जात असेल... तर खरंच हे सगळे कंत्राट कसे मिळवले गेले ? यात खरंच गैर व्यवहार झाला का ? आणि जर घोटाळा झाला असेल तर आणखी कोणाची नाव यामध्ये समोर येतात ?  हे या तपास यंत्रणांच्या चौकशीनंतर समोर येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget