Mumbai Dog Attack : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत कुत्र्यांची दहशत! लहान मुले, महिलांसह वृद्धांवरही हल्ला; घटना सीसीटीव्हीत चित्रित
Mumbai Dog Attack : मुंबईतील कांदिवलीच्या समता नगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध सरोवा कॉम्प्लेक्समध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कुत्र्यांना माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
कांदिवली, मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत कुत्र्यांची दहशत (Dog Attack) पाहायला मिळत आहे. येथे भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) धोका निर्माण झाला आहे. भटके कुत्र्यांनी लहान मुले, महिला, वृद्ध यांच्यावर कुत्र्यांने हल्ला केला आहे. कुत्र्यांच्या दहशतीची घटना सीसीटीव्हीतही चित्रित झाली आहे. मुंबईतील कांदिवलीच्या समता नगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध सरोवा कॉम्प्लेक्समध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर समोर आला आहे. गेल्या महिनाभरात लहान मुले, महिलांना या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. गेल्या महिन्याभरात कुत्रा चावल्याच्या डझनभर घटना समोर आल्या आहेत. काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.
मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत कुत्र्यांची दहशत
सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्यांपैकी एका घटनेत कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. एक लहान मूल सोसायटीच्या पार्किंग एरियातून जात होते, त्यादरम्यान कुत्र्यांनी मुलावर हल्ला केला. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी मुलाला कुत्र्यांपासू वाचवले. दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन जात होती, त्यादरम्यान या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटनाही चित्रित झाली आहे.
लहान मुले, महिलांसह वृद्धांवरही हल्ला
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे हे या सोसायटीमध्ये दहशतीचं वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या सोसायटीतील 400 लोक थेट रस्त्यावर उतरले आहे. प्रकरण तापत असल्याचे पाहून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची ही घटना एबीपीने सर्वांसमोर आणली आहे. या ठिकाणी आजही रस्त्यावरील कुत्र्यांचा वावर असून नागरिक भीतीच्या छायेखाली जात आहेत. दरम्यान, यावेळी येथे प्राणीप्रेमीही दाखल झाले. सोनल बबळे नावाची प्राणीप्रेमीही येथे पोहोचली. श्वानप्रेमी म्हणतात की, कुत्र्यांवर हल्ला होईपर्यंत कुत्रे हल्ला करत नाहीत.