एक्स्प्लोर

Corona Updates | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर; आज 1475 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्या वर गेली आहे. पैकी 42 हजार 215 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 45 हजार 947 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 72 हजार 315 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 139 कोरोनाबाधित रुग्णांच्या आज मृत्यू झालाय.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू

  • ठाणे जिल्हा - 93 (मुंबई 54, ठाणे 30, कल्याण डोंबिवली 7, वसई विरार 1, भिवंडी 1
  • नाशिक - 24 (नाशिक 2, जळगाव 14, मालेगाव 8)
  • पुणे - 16 (पुणे 14, सोलापूर 2)
  • कोल्हापूर - 5 (रत्नागिरी 5)
  • औरंगाबाद 1 (औरंगाबाद 1)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 75 पुरुष तर 64 मिहला आहेत. आज नोंद झालेल्या 139 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 78 जण आहेत तर 53 जण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर आठजण 40 वर्षाखालील आहे. या 139 जणांपैकी 110 जणांमध्ये (79%) मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2849 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू 21 एप्रिल ते 2 जून या कालावधीतील आहेत.

राज्यातील 11 जिल्ह्यात अद्याप कोरोनासाठीच्या स्वॅब लॅब उपलब्ध नाही

महाराष्ट्रात मिशन बिगेन अगेन देशभरात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे राज्य सरकार राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने अनलॉकची घोषणा करत हॉटेल आणि सलूनला परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यात केवळ नॉन कंटेनमेंट झोनमध्येच यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातही हळूहळू काही उद्योग अनलॉक होत आहेत. मात्र, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील ही अपेक्षा आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

Mission Began Again | मुंबईत गॅरेज सुरु करण्यास महापालिकेची परवानगी; कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget