'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप
1995 ला आमचं सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, मग आता आचारसंहिता बदलली का?
Uddhav Thackeray on MP Election 2023 : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. तसेच, एकीकडे भाजपला फ्री हीट द्यायची आणि भाजपला फ्री हिट द्यायची आणि आमची विकेट घाययाची हे बरोबर नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खास शैलीत निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. तसेच, मध्यप्रदेशात पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या वक्तव्याबाबत बोलताना निवडणूक आयोगानं आचारसंहिता बदलली काय? असा प्रश्नही निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि गोड झाली. टीम इंडिया चांगली खेळली. विराटचं अभिनंदन. आमच्या पिढीनं सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर विराट कोहली हे तीन दिग्गज एकत्र पाहिले आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "एकीकडे वर्ल्डकप, दुसरीकडे निवडणूक सुरू आहे. निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र लिहिलं आहे. काही शंका कुशका आहेत. भाजपला फ्री हिट द्यायची आणि आमची विकेट घाययाची हे बरोबर नाही. 1995 ला आमचं सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता."
"भाजप कर्नाटकमध्ये बजरंग बली की जय म्हणत मतदान करा म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत आता अयोध्येला खर्च येणार नाही, असं म्हणतायत. भाजपकडून मोफत अयोध्या वारी घडवण्याची घोषणा करण्यात आली. 22 जानेवरीला अयोध्या राममंदिर सुरू होईल, उदघाटन होणार आहे. 5 कोटी लोक तिथे भाजपवाले आणतील.", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
"जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव म्हणून तुम्ही आता मतदान करा, हे मी जनतेला आव्हान करतो. निवडणूक आयोगानं आचार संहितेत बदल केला का? हा प्रश्न आम्ही पत्रातून विचारला आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी, केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवल्या आहेत. ते एवढे जागृक आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं आता सरकारी भाषेत आपला या सगळ्यांबाबत निर्णय अवगत करावा. निवडणूक प्रचार पूर्ण व्हायच्या आत याचं उत्तर मिळावं.", असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केलं आहे.