एक्स्प्लोर

वाघिणीची शिकार करून नखे, शीर काढून जमिनीत पुरले; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

Gadchiroli Tiger Poaching : गडचिरोलीमध्ये आणखी एका वाघिणी शिकार करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. या वाघिणीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता.

Gadchiroli Tiger Poaching : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वाघिणीची शिकार करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनीचा वापर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. वाघिणीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. मात्र, नखे आणि शीर नसल्याचे आढळून आले आहे. वाघिणीला लक्ष्य करून ठार मारल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभागाने पंचनामा केल्यानंतर वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

अहेरी वनक्षेत्रात मोसम गावातील वनकक्ष क्र. 615 मध्ये ही घटना घडली. या भागात मोठी दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी पसरण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी सुरू केला होता. त्यावेळी ही बाब समोर आली. वन कर्मचाऱ्यांची शोध मोहीम सुरू असताना त्यांना काही वीजतारा आढळून आल्या. घटनास्थळाच्या आसपास 300 मीटर अंतरावर उच्चदाब वीजवाहिनी आहे. सुमारे 1 किलोमीटरची तार वापरून तारजाळे पसरवून ही शिकार केली असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले. वीजप्रवाहाचा धक्का लागून वाघ मृत झाल्यावर त्याला जमिनीत पुरले. मृत वाघिणीची नखे आणि शीर मात्र बेपत्ता आहे. या वाघिणीचा मृत्यू 7 ते10 दिवस आधीच झाला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

वनविभागाने पुरलेला वाघीण मृतदेह नियमानुसार खणून काढत पंचनामा करून त्याचे दहन केले. वनविभाग आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, काही दिवसांपासून या भागात वाघीण असून ग्रामस्थांनी सावध रहावे अशी दवंडी देण्यात येत होती. 

दरम्यान, महाराष्ट्रात सहा महिन्यांत 23 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वाघांपैकी 15 वाघांचा नैसर्गिक कारणानं, चौघांचा विषाच्या वापरामुळं, दोघांचा शिकारीमुळं, एका वाघाचा रेल्वे अपघातामुळं आणि एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. या 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ होते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, कामगार काम करत असतानाच आगडोंब उसळला, भिवंडीतील घटना 
तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, कामगार काम करत असतानाच आगडोंब उसळला, भिवंडीतील घटना 
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? 'या' नावांची जोरदार चर्चा 
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? 'या' नावांची जोरदार चर्चा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 3 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBhai Jagtap On Bandra East Vidhan Sabha | वांद्रे पूर्व ठाकरेंची नाही काँग्रेसची जागा ABP MajhaRamesh Gavhal On Santosh Danve | रावसाहेब दानवेंप्रमाणे त्यांच्या मुलाचा देखील विधानसभेत पराभव करू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, कामगार काम करत असतानाच आगडोंब उसळला, भिवंडीतील घटना 
तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, कामगार काम करत असतानाच आगडोंब उसळला, भिवंडीतील घटना 
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
जीप चालक ते आमदार! बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? 'या' नावांची जोरदार चर्चा 
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? 'या' नावांची जोरदार चर्चा 
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Embed widget