(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Serum Institute fire : कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त केली. त्यामुळे खरंच असं झालं का याचा तपास केला जाईल. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढू नका, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पुणे : देशाला कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची बातमी लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. दुर्घटना घडली तेथील दोन मजले वापरात होते. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. कोव्हीडची लस जिथे बनवली जाते त्या विभागाला आगीचा फटका बसला नाही. प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यामुळे खरंच असं झालं का याचा तपास केला जाईल. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढू नका. आगीचा कोणताही परिणाम लसीकरणावर होणार नाही.
आदर पुनवाला म्हणाले, एक हजार कोटी रुयांपेक्षा अधिक नुकसान कालच्या आगीमुळे झाले आहे. बीसीजी आणि अन्य औषधांचे नुकसान झाले आहे. कोव्हीशील्ड पुर्णपणे सुरक्षित असून त्याच्या निर्मिती प्रक्रियेवर कोणताच परिणाम होणार नाही.
सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांटला आग लागली आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :