एक्स्प्लोर

Sharad Mohol : पत्नीमार्फत भाजपमधून राजकारणात प्रवेश करणारा कुख्यात गुंड शरद मोहोळ आहे तरी कोण?

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र शरद मोहळ याने पत्नीच्या मार्फत भाजपमधून राजकारणात उतरल्याचं सांगितलं जातंय.

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळ (sharad mohol) याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता अनेकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र पत्नीच्यामार्फत भाजपमधून राजकारणात उतरणारा शरद मोहोळ कोण?
 
या पक्ष प्रवेशानंतर कुख्यात गुंड शरद मोहोळ याची चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या काळात निवडणुका आहे. त्यात भाजपला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची मदत होऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं वर्चस्व हे पुण्यातील कोथरुड परिसरात आहे. त्यात परिसरात चंद्रकांत पाटील आमदार आहेत. त्यासोबतच मुरलीधर मोहोळदेखील याच परिसरात राहतात. आगामी निवडणुकांसाठी शरद मोहोळ यांची नेत्यांना गरज भासू शकते. यामुळे हा प्रवेश केला गेला असावा, अशा चर्चा आहे. पुण्यातील गुंडांना पाठीशी घालणं आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणं यामध्ये भाजपदेखील आता मागे नाही आहे, हे दिसून येत आहे. 

कोण आहे शरद मोहोळ?

शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला.  मात्र बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरु केलं. खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं. मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळने स्वतःच्या पत्नीच्या मार्फत राजकारणात उतरायचं ठरवलं आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे. त्यामुळे कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शरद मोहोळचा त्यांना फायदा होईल, असं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP MajhaVikram Singh Pachpute Special Report : बोगस Paneer चा मुद्दा विधानसभेत, विक्रमसिंह पाचपुते आक्रमकSpecial Report | Santosh Deshmukh | ह्रदय हेलावणारे संतोष देशमुखांचे ते अखेरचे शब्द..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
Embed widget