नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, महापौर आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात तब्बल दीड वर्षानंतर महापालिकाची महासभा ऑफलाईन पद्धतीने सभागृहात पार पडली. सभागृहात आज नगरसेवकांनी आवाज तर घुमलाच पण गोंधळही खूप झाला.
नाशिक : नाशिक महानगरपालिकाची महासभा वादळी ठरली. आयटी पार्कला परवानगी देण्यासाठी विशेष महासभा बोलविण्यात आली होती. विरोधी पक्ष शिवसेने पाठोपाठ भाजपच्या काही नगरसेवकांनी ही विरोध केल्यानं गोंधळात भर पडली.
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात तब्बल दीड वर्षानंतर महापालिकाची महासभा ऑफलाईन पद्धतीने सभागृहात पार पडली. सभागृहात आज नगरसेवकांनी आवाज तर घुमलाच पण गोंधळही खूप झाला. महानगरपालिकाच्या ताब्यातील आडगाव शिवारातील दहा एकर क्षेत्रात आयटी पार्कचे आरक्षण टाकून भविष्यात पसरीसरतील 100 ते 150 एकर जागा संपादित करण्यासाठी विशेष महासभा बोलविण्यात आली होती. प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बिल्डर धार्जिना असल्यानं विरोधकासह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाही विरोध दर्शवित प्रस्तावावर संशय व्यक्त केला. या आधी ही नाशिक शहरात आय टी पार्कसाठी प्रयत्न झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क उभाही राहिला मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यानं मनपा आय टी पार्क का उभारते हा सवाल उपस्थित करण्यात आला. बिल्डरांच्या जमिनी न घेता शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली, वेळ प्रसंगी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे जाण्याचा इशारा ही दिला आहे.
नाशिक शहरात कुठल्या आय टी कंपनी येण्यास उत्सुक आहेत, अशी विचारणा सदस्यांनी केल्यानंतर प्रशासनाकडे याचे उत्तर नव्हते. नाशिक शहराच्या भावी पिढीसाठी आय टी पार्क गरजेचा असल्याचं सांगत महापौरांनी दुरुस्तीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकाच्या निवडणुका 6 ते 7 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मोठं मोठे प्रकल्पाची मंजुरी, भूमिपूजन, आणि उद्घाटनाचा धडका येत्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाकडून लावला जाणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यापुढेही खटके उडण्याचे प्रसंग घडण्याची चिन्ह दिसत असून दिवाळीनंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.