एक्स्प्लोर

Mumbai Weather updates | मुंबईवर दाट धुक्याची चादर; तापमान घसरल्यानं मुंबईकर गारठले

मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढल्याने तापमानाचा पारा घसरला आहे. या गुलाबी थंडीचा आनंद मुंबईकर घेत असल्याचं चित्र आहे.

मुंबई: पहाटे पडत असलेल्या दाट धुक्यांमुळं मुंबईसह राज्यात थंडीचं आगमन झाल्याचं चित्र आहे. या थंडीची आतुरतेनं वाट पाहत असलेले लोक यामुळे सुखावले आहेत. मुंबई मध्ये गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पहाटे पासून मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. मुंबईचा पारा देखील खाली आला असून मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.

गेले दोन दिवस मुंबईचे वातावरण ढगाळ होते. मात्र काल रात्री पासून दक्षिण मुंबई, मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणत धुकं पसरलेलं आहे. या दाट धुक्यांमुळे पहाटेपासून रस्त्यांवरचं काहीच दिसत नाही. त्यामुळे चालकांना वाहने देखील सावकाश चालवावी लागत आहे. पवईच्या तलावावरदेखील अशीच धुक्याची चादर दिसून येत आहे.

मुंबईतील हवेत गारवा चांगलाच वाढल्यानं पहाटे व्यायाम करण्यास तसेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. इतके दिवस कोरोनामुळे घरात असलेले मुंबईकर आता पहाटे मात्र या धुक्यात आणि गुलाबी थंडीत बाहेर पडून त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

सिंधुदुर्गातही दाट धुकं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र दाट धुकं पसरल्याचं चित्र आहे. महत्वाचे रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत. गेली काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. अचानक कधी पाऊस पडतो तर कधी कडाक्याची थंडी पडत असल्याचं पहायला मिळते.

आंबा उत्पादक संकटात गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहेत. आज दाट धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आहे. काही लोकांसाठी ही गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली तरी बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या वातावरणाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील प्रमुख फळपिक असलेल्या आंब्याला सर्वाधिक फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर औषधे फवारण्याची आवश्यकता भासणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे औषध फवारणीमुळे आंबा उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच मोहोरावर करपा रोग पडण्याची शक्यताही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे.

राज्यभरात थंडीचा जोर राज्यातील काही भागात गेल्या चार दिवसात तुरळक पाऊस पडला होता. आता राज्यातील बहुतांश भागात थंडीनं जोर खाल्ला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानाच झपाट्यानं घट झाली आहे. पुढील काही दिवसात हे थंडीचं चित्र कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

पहा व्हिडिओ:Nashik Fog | नाशिक शहरावर दाट धुक्याची चादर; गोदोकाठ, मंदिरं, रस्ते धुक्यात हरवले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech : खालून प्रेत गेलं असेल एखादं...राज ठाकरंची तुफान फटकेबाजी ABP MAJHARaj Thackeray Speech : मुंबई पाच नद्या होत्या, चार मेल्या...मिठी नदी सुद्धा मरायला आली आहेRaj Thackeray Speech : कुंभमेळा, गंगा ते प्रदुषण...राज ठाकरेंचं सरकारवर पलटवार ABP MAJHASpecial Report On PM Modi Nagpur : स्वंसेवक पंतप्रधान मोदी, संघाची स्तुती;भाजप-संघातली ओढाताण संपली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
Embed widget