एक्स्प्लोर

सोशल मीडियावर द्वेषपूर्ण धार्मिक मेसेज पोस्ट करताय? सावधान... पोलिसांची तुमच्यावर नजर, कारवाई होण्याची शक्यता

Social media: छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता महाराष्ट्र पोलिस सतर्क झाले असून द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. 

मुंबई : सोशल मीडियावर कोणताही धार्मिक किंवा द्वेषपूर्ण संदेश पोस्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. महाराष्ट्र पोलीस अशा प्रकारचे मेसेज डिलीट करत असून त्यानुसार पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. राज्यात रामनवमी सण आणि सध्या सुरू असलेला रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस आधीच अलर्टवर होते. परंतु छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर आता पोलिस अधिक सतर्क झाले असून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. 

सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा पोस्ट पोलिसांकडून डिलिट केल्या जात असून त्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अधिक सतर्कता आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे आधीच अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच गुन्हा संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मुंबईत काल मालवणीत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य गुप्तचर विभाग आणि विशेष शाखा सतर्क आहेत आणि अशांतता निर्माण करणारी प्रत्येक माहिती गोळा करत असून खबरदारी घेत आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावरून आक्षेपचे मेसेज आणि इतर मेसेज डिलीट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत. सोशल मीडियावरही द्वेषपूर्ण संदेशाचे युद्ध सध्या सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. असे अनेक संदेश आधीच प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ 

बुधवारी रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमरास काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. दोन्ही बाजूने चार-चार मुलं होती. यता एकाबाजूची मुलं निघून गेली, पण गर्दी जमा झाली होती. परंतु पोलिसांनी तत्काळ जमा झालेला जमाव पांगून लावला. हा पहिला टप्पा होता. मात्र त्यानंतर पुन्हा 50-60 लोकं आली, पण ते आक्रमक नव्हते. पोलिसांनी त्यांना देखील पांगवले. पण त्यानंतर एक-दीड तासाने मोठा जमाव झाला. हा सर्व प्रकार तीन-चार तास सुरु होता. ज्यात एक ते दीड तास दगडफेक सुरु होती. म्हणजेच हा सर्व राडा वेगवेगळ्या तीन टप्प्यात झाला.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAvinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget