अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक, पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? पालक संतप्त
शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पंढरपूर : पंढरपुरातून (Pandharpur) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक आढळले आहे. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. बेडकाचं मृत पिल्लू पोषण आहारात सापडलंय. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय असा सवाल उपस्थित झालाय.
शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेला किडा आढळला होता. परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता. म्हणजे हे बेडकाचे पिल्लू किती महिन्यांपूर्वी मरुन पडले असेल याचा विचार न केलेलाच बरा आहे. शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.
ठेकेदारावर करवाई करण्याची मागणी
एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने कोणतेही खंबीर पाऊल उचलले नसले तरी प्रशासन कामाला लागले आहे. ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरलं असून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.
विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर
शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असुन यातुन नक्की पोषण कुणाचे केलं जातय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे, पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे.
जालन्यात पोषण आहारात अळ्या आढळल्या
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव केंद्रांअतर्गत येणाऱ्या सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यात अळ्या आढळून आल्यात. यावेळी गावातील ग्रामस्थानी ही बाब शाळेच्या मुख्यध्यापकांच्या निदर्शनात आणून देत त्यांना जाब विचारत चांगलच धारेवर धरलय.
हे ही वाचा :