मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका; नागपूरहून मुंबईला येणाऱ्या अनेक आमदारांचा विमानतळावरच मुक्काम
Mumbai Rain Updates : मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे.परिणामी, विधिमंडळाच्या कामकाजाला विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक आमदार आणि मंत्री नागपूर विमानतळावर अडकून पडले आहेत.
![मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका; नागपूरहून मुंबईला येणाऱ्या अनेक आमदारांचा विमानतळावरच मुक्काम mumbai heavy rain updates air traffic affected Many MLA s coming from Nagpur to Mumbai stay at the nagpur airport maharashtra marathi news मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका; नागपूरहून मुंबईला येणाऱ्या अनेक आमदारांचा विमानतळावरच मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/07fa686a03adc025d177fc52cda7bbec1720424969944892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबई आणि मुंबई उपनगरासह (Heavy Rain In Mumbai) राज्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. एकट्या मुंबईत अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल 300 मिलिमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Train) आणि रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.
पुढील काही तास मुंबईसाठी (Mumbai Rain) अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. अशातच या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूर ते मुंबई हवाई वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, विधिमंडळाच्या कामकाजाला विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक आमदार नागपूर विमानतळावर अडकून पडले आहेत.
अनेक आमदारांचा विमानतळावरच मुक्काम
यात आमदार अशोक धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार सुधाकर अडबोले, आमदार रवी राणा, आमदार रवींद्र भुयार, केंद्रीय राज्य रक्षा मंत्री रक्षा खडसे, असे अनेक आमदार आणि नेते नागपूर विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे जोपर्यंत पावसाचे विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित होत नाही तोपर्यंत विमान वाहतूक सेवा पूर्ववत होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज देखील एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
अनेक विमानं मुंबई विमानतळावरून अन्यत्र वळवली
राज्यात काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाच्या सतत धारेने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले आहे. परिणामी त्याचा फटका रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक पाठोपाठ हवाई वाहतुकीला देखील बसला आहे.मुंबई विमानतळावर अनेक हवाई उड्डाणे उशिरा होत आहेत. अनेक विमान मुंबई विमानतळावरून अन्यत्र वळवण्यात आली आहे. अहमदाबाद हैदराबाद कडे जाणारी विमान मुंबई विमानतळावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे या हवाई वाहतुकीचा फटका प्रवाशांना बसला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसालाच पावसामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी 1.57 वाजता समुद्रात भरती (High tide in Sea) आहे. यावेळी समुद्रात ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)