एक्स्प्लोर

Vidarbha Weather Update : विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण! जनजीवन विस्कळीत, पोलीस भरती प्रक्रियाही रद्द 

Vidarbha Rain News :हवामान विभागानं वर्तवविलेले अंदाजानुसार राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Vidarbha Weather Update : नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार राज्यासह विदर्भात मुसळधार पावसानं  एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने प्रवास करत आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. तर या पावसाचा फटका अकोल्यात (Akola Rain) सुरू असलेल्या पोलीस भारतीवर देखील झाला आहे.

पुढील काही दिवस पावसची ही परिस्थिती अशीच कायम असणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. परिणामी संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता सुरक्षिततेच्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक जिल्हा प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण

एकट्या अकोल्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरून वाहनं चालवतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. महापालिकेनं केलेलं नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय. या पावसामुळे सर्वत्र एकच  दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच आकोट-अकोला महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला पुल खचला होता. आता पुन्हा या मार्गावरील चोहोट्टा बाजार आणि करोडी फाटा नदीच्या पुलावरील आधार भिंती अक्षरशः पहिल्या पावसात कोसळली आहे. या पुलाला बांधकामाला काही महिनेच उलटले आहे. नुकत्याच कालच्या आणि आजच्या पावसामुळे अकोट अकोला मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाची आवार भिंत कोसळली आहे.

मूसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया रद्द 

अकोल्यात काल रात्रभरापासून सुरू असलेल्या मूसळधार पावसामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलीय. तर या भरती प्रक्रियेत काहिसा बदल झालाय. आज 8 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आता पुढं 11 जुलै रोजी असणार आहे. आज 8 जुलै रोजी तब्बल 1 हजार 154 महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी होणार होती, मात्र पावसामूळ ही मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळ या मैदानी चाचणीसाठी तारीख 11 जुलै रोजी ठरली आहे.

दरम्यान अकोला पोलीस दलात 195 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया मागील 19 जून पासून सुरु झालीय. पण काल रात्री व आज सकाळपासून सुरू असलेल्या पाऊसामुळे पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडीयम मैदानावर शारीरीक चाचणी ही घेता येणार नाही. आता नव्याने पोलीस भरती साठीचे वेळापत्रक हे ठरलेले असुन त्यानुसार भरती प्रक्रीया 11 जुलैला असणार आहे. त्यामुळ महिला उमेदवारांनी 11 जुलै रोजी हजर राहावे, अस आवाहन अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी केले आहे. विशेष म्हणजे पाऊसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था अकोला पोलीस लॉन येथे करण्यात आली होती.

घराची भिंत अंगावर कोसळून इसमाचा मृत्यू

मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अशात आज दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसानं जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असं मृतकाचं नावं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 03 PM : 22 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBalasaheb Thorat On Sanjay Gaikwad  : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाहीTop 25 news : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget