एक्स्प्लोर

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका; कडेला टाकलेला भराव खचला

Mumbai Goa Highway : अखेर बहुप्रतीक्षित अशा मान्सूनने राज्यात दमदार एंट्री केली आहे. अशातच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे.

Mumbai Goa Highway News : मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे. अखेर बहुप्रतीक्षित अशा मान्सूनने राज्यात दमदार एंट्री केली आहे. अशातच पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) रस्त्यांची परिस्थिती समोर आली आहे. अलिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचं काम खचत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर आता याच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील  (Parshuram Ghat) रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे.

अलिकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मातीचा भराव अक्षरक्ष: वाहून गेलाय. सध्याघडीला या घटणेमुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी, भराव वाहून गेल्याने साईड पट्टीला मोठ्या तडा गेल्या आहेत. परशुराम घाटातील डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोकणात सर्वत्र पावसाने एकच दाणादाण केल्याचे चित्र आहे. 

मुसळधार पावसाची सर्वत्र दाणादाण 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील दुरावस्था समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्यातरी या प्रकारामुळे वाहतुकीला परिणाम झाला नसला तरी पुढे यातून मोठी दुर्घटना निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासना कडून करण्यात आली आहे.

तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूकिसाठी बंद 

तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तिलारी घाट आजपासून 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूकिसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोडामार्ग ते चंदगडला जोडणाऱ्या तिलारी घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. तिलारी घाटातील जीर्ण संरक्षक कठडे, अवघड वळणांमुळे अपघाताची भीती असल्याने 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदगड तालुक्यातील परिते- गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते तिलारी घाट मोटर वाहन कायदा 115 आणि 116 अन्वये अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खूपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असून घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा वळण बसत नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणारSharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण?  की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, खासगी कंपन्या आणि चालकांना दिल्या 'या' सूचना
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Embed widget