Morning Headlines 30th August : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
PM Modi : गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानं भगिनींना दिलासा, त्यांचे जीवन अधिक सुकर होईल : पंतप्रधान
PM Narendra Modi : आजपासून (30 ऑगस्ट) घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Price) 200 रुपयांनी कमी होणार आहेत.याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur On LPG Cylinder Price) यांनी काल (29 ऑगस्ट) केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानं आपल्या भगिनींचे जीवन अधिक सुकर होईल असं पंतप्रधान म्हणाले. वाचा सविस्तर
Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता
Pulses Price Hike: केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही डाळींचे (Pulses) भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीत. विशेषत: तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. या वर्षभरात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली आहे, त्यामुळे उडीद ते मसूर डाळीचे भावही तेजीत आहेत. त्याचबरोबर यंदा पाऊस कमी झाल्याने येत्या काही दिवसांत डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Agriculture News : शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावं, कृषी विभागाचं आवाहन; 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
Agriculture News : शेतकऱ्यांनी (Farmers) खरीप हंगाम सन 2023 मधील पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. कृषी विभागामार्फत या चालू खरीप हंगामात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वाचा सविस्तर
India-China Border Conflict : चीनकडून LAC जवळ बंकर, भूमिगत सुविधांचे बांधकाम सुरु; वाचा सविस्तर
अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हा आपला भूभाग असल्याचे सांगून चीनने नवीन नकाशे जारी केले आहेत. दरम्यान, तो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) पूर्वेकडील अक्साई चिन परिसरात बोगदे बांधत आहे. नदीच्या खोऱ्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी सैनिक आणि शस्त्रास्त्रांसाठी बोगदे आणि बंकर बनविण्याचे काम सुरू केले आहे. ही बांधकामे उत्तर लडाखमधील डेपसांग मैदानापासून 60 किलोमीटर अंतरावर दिसली आहेत. हे क्षेत्र LAC च्या पूर्वेस अक्साई चिनमध्ये आहे. वाचा सविस्तर
30th August In History: नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या, अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म; आज इतिहासात
30th August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पुण्यात नारायण पेशवे यांची आजच्या दिवशी हत्या झाली. स्वत:च्या काकांच्या गारद्यांनीच नारायणराव पेशव्यांची हत्या केली आणि संपूर्ण मराठेशाही हादरली. अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा आज जन्मदिन देखील आहे. आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा सविस्तर
Horoscope Today 30 August 2023 : वृषभ, सिंह, कुंभसह 'या' राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 30 August 2023 : आज मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक आपल्या कुटुंबीयांबरोबर जास्त वेळ घालवतील. तर, धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. एकूणच, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर