Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज, पुढील दोन दिवस..
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain alert: राज्यात परतीच्या पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून ओसरला असला तरी चक्राकार वाऱ्यांची (cyclonic circulation) स्थिती सध्या मध्य प्रदेश व आजुबाजूच्या भागात सक्रीय असल्यानं राज्यात पावसाची शक्यता असल्याचं हवमाान विभागानं सांगितलं आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असून आज 6 जिल्ह्यांत यलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र- कोकणात मुसळधारा
राज्यात चक्राकार वाऱ्यांची सक्रीयता असल्यानं मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता
मराठवाड्यात आज तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्याला आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येत्या 24 तासात पुन्हा पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सांगली तसेच कोकणातील सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज ही देण्यात आलाय.
6 ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर
परतीच्या पावसाचा जोर सध्या ओसरत असून ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेपासून पुन्हा एकदा विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके सहा ऑक्टोबर पर्यंत उरकून घेण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?
सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले.
हेही वाचा: