एक्स्प्लोर

Nashik News : कुटुंबासाठी तो अहोरात्र झटत होता, थर्टी फस्टला रात्रीच्या अपघातानं सर्व हिरावून घेतलं... 

Nashik News : थर्टी फस्टला कंपनीकडून फूड डिलिव्हरी बॉय यांच्यासाठी ऑफर जाहीर करण्यात आली होती.

Nashik News : नाशिक (Nashik) शहरात दुःखद घटना घडली असून 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने यात फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककरांनी यंदा मोठ्या उत्साहात 31 डिसेंबर साजरा केला. या दिवशी हॉटेल्स रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात बुकिंग होते तर रस्त्यालगतच्या हॉटेल्सला गर्दीचा महापूर होता. अशातच ऑनलाईन फूडला देखील नाशिककरांनी पसंती दर्शवली. त्या पार्श्वभूमीवर फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून त्या दिवशी नागरीकाकांसह फूड डिलेव्हरी बॉयस ला देखील ऑफर्स देण्यात आली होत्या. त्यामुळे अनेक फूड डिलेव्हरी रायडर्सनी सुट्टी न घेता रात्री उशिरा पर्यंत काम करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिकमध्ये काम  करणाऱ्या सागर याने देखील ऑफर्स असल्याचे पाहून अधिक वेळ काम करण्याचे ठरवले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. फूड डिलिव्हरीसाठी जात असताना अज्ञात कारने दुचाकीस धडक दिली. या धडकेत फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला. 

सिडकोतील त्रिमूर्ती चौकात झालेल्या या अपघातात फूड डिलिव्हरी बॉय सागर दगा धिवरे (Sagar Dhivare) असे मयत झालेल्या दुचाकी स्वारी युवकाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको त्रिमूर्ती चौकात शनिवारी मध्यरात्री देवरे यांच्या दुचाकीला एका मोटारीने जोरदार धडक दिली. धिवरे हा कॉलेज रोड येथून सिडको त्रिमूर्ती चौकमार्गे पाथर्डी फाट्याकडे दुचाकीने ऑनलाइन फूड पार्सल डिलिव्हरी साठी जात होता. रविवारी मध्यरात्री पावणेदोन वयाच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात जात असलेल्या कारने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. यावेळी दिवरे हे दुचाकीवरून खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जवळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मदत घोषित केले. 

दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघात ग्रस्त कार सध्या अंबड पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील तपास सुरू आहे. धिवरे हे मागील चार वर्षांपासून नियमितपणे फूड डिलिव्हरीचे काम करत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युनंतर परिसरात तसेच शहरातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी रायडरच्या ग्रुप मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारचालका विरुद्ध कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांसह डिलिव्हरी बॉईज कडून होत आहे. धिवरे हा अत्यंत सावधगिरीने व मध्यम गतीने दुचाकी चालवणारा रायडर होता, असे त्याच्या जवळच्या सहकारी मित्रांनी देखील यावेळी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget