एक्स्प्लोर

शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका; भाजप नेत्यांनी हात झटकले

Aurangabad: आगामी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते.

Aurangabad News: जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. तर भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. मुख्यालयाचा ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये बंब यांच्याबद्दल रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा बंब यांची वैयक्तिक भूमिका असून, भाजपची ही भूमिका नसल्याचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी म्हंटले आहे. 

भागवत कराड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मुख्यालयी वास्तव्य न करणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची भूमिका भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी घेतली असून, त्यावरून शिक्षकांत नाराजी असल्याकडे डॉ. भागवत कराड यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले.  त्यावर बोलतांना कराड म्हणाले की, मुख्यालयाचा मुद्दा हा आमदार बंब यांची वैयक्तिक भूमिका असून, भाजपची ही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षकांच्या मुख्यालयाच्या मुद्यावरून आमदार बंब यांनी घेतलेल्या भुमिकेवरून भाजपने हात झटकले असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 

आमदार बंब यांची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरणार?

आगामी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. मात्र असे असतानाच आमदार प्रशांत बंब यांची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचा आमदार बंब यांनी उपस्थित केलेला मुद्दा त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

प्रशांत बंब यांच्या रडारवर अधिकारी?

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रशांत बंब यांच्या रडारवर आता केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारीअसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण  या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांत किती जि. प. शाळांना भेटी दिल्या, त्याचा अहवाल आमदार बंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागितला आहे. तर मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात आमदार बंब यांनी घेतलेल्या भुमिकेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांचे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. 

अखेर कारवाई! मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात; आमदार बंब यांच्या मागणीला यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Embed widget