एक्स्प्लोर

Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक

येत्या 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे .

Beed: राज्यात एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारणाला वेग आलाय . अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी (30 जानेवारी) बीडमध्ये येणार आहेत .  बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत .  येत्या 30 जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे . (Beed)

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) चांगलेच चिघळले आहे . या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे . खंडणी ते खून प्रकरण या संपूर्ण घटनाक्रमात धनंजय मुंडेच सूत्रधार असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे . दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर भाजप आमदार सुरेश धस यांनी बोट ठेवल्यानंतर  तपासाला वेग आलाय .या सगळ्या घटना घडत असताना पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अजित पवार बीडमध्ये येणार आहेत .या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात,आढावा बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे .  (Beed)

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये आढावा बैठक

येत्या 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे .या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली . बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत .विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे . 30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल .या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली .प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती,प्रलंबित किती? प्रलंबित राहण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली . दरम्यान १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील . या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्य अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा समजला जात आहे . (Ajit Pawar)

हेही वाचा:

Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
अवास्तव मागण्या पूर्ण कशा होणार? मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात नेमकं काय म्हणाले महाजन? 
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget