एक्स्प्लोर

Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेशोत्सवाची ओढ! पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर, 'या' मुर्तींना मागणी अधिक

Mumbai Ganeshotsav : यावर्षी कोरोनाचे सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.

Mumbai Ganeshotsav : दहीहंडी झाल्यानंतर मुंबईत गणेशोत्सवाची (Ganeshotsav) ओढ लागलीय. दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईत (Mumbai) साजरा होणार आहे. मुंबईची ओळख असणाऱ्या लालबाग परिसरातील मंडळांची, व्यावसायिकांची तयारी जोरदार सुरु आहे. सोबतच घरगुती गणेश मुर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर असून विविध घरगुती मुर्तींची मागणी नागरिक करत आहेत. 

यंदा गणेश भक्तांमध्ये उत्साह
मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. सोबतच कोरोना आधी ज्या गणेशमुर्तींना मागणी होती, तीच मागणी यावर्षी देखील कायम आहे. 

पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर 
घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लालबागच्या राजाची जादू कायम आहे. सोबतच घरगुती गणपतींसाठी बाल गणेशाच्या मुर्तींची मागणी यावर्षी वाढलेली दिसते. दोन वर्ष झाले सार्वजनिक मंडळाचा चिंतामणी विराजमान न झाल्याने चिंतामणीच्या रुपाला अधिक मागणी आहे. सिंहासनारुढ बाप्पाच्या रुपाची क्रेजही कायम आहे. पीओपीपेक्षा मातीच्या मुर्तींना मागणी अधिक वाढलीय. एकूणच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसतोय 

लालबागच्या राजाची मागणी अधिक

लालबागच्या राजाचे रुप अनेकांना भावतं आणि त्यामुळे दरवर्षी असणारी याची मागणी कायम आहे. लालबागच्या राजाचेमुर्तीकार असलेल्या संतोष कांबळी यांच्याकडे थेट रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमधून गणेश मंडळ आल्याचं बघायला मिळालं. रत्नागिरीसोबतच सुरत, दिल्लीसारख्या ठिकाणांवरुन देखील लालबागच्या राजाच्या रुपाची मागणी होते. यंदा नियमावली थोडी उशिरा आल्यानं वेळ न मिळाल्याची देखील खंत मुर्तीकार व्यक्त करतायत. सोबतच, कारागिरांचीअसलेली कमतरता आणि वेळेचा अभाव यामुळे अनेक मंडळांच्या मागण्या पूर्ण न करु शकल्याची देखील खंत मुर्तीकारांनी व्यक्त केलीय. 

सर्वसामान्य जीवन रुळावर येतंय

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारं देखील सजली आहेत. अनेक अर्थानं सर्वसामान्य जीवन रुळावर येत असल्याचे संकेत आहेत. गणेश आगमनावेळी गणेश भक्तांचा जल्लोष आणि उत्साह दांडगा आहे. दोन वर्षांनंतर भक्तांच्याउत्साहाची गाडी पुन्हा एकदा रुळावर येताना पाहायला मिळत आहे. 

कोकणातील गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून 2310 अतिरिक्त बसेस

मुंबई व परिसरातील अनेक कोकणवासिय गणेशोत्सवात गावी जाणार आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी केली आहे. एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस (MSRTC Extra Buses) सोडण्यात येणार आहेत. यंदा बाप्पाचे आगमन 31 ऑगस्ट रोजी होणार असून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जादा बसेस चालवण्यात येणार आहे. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

High Court : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी

Todays Headline 23rd August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget